बाळापूर : तालुक्यातील वाडेगाव येथे महाशिवरात्री तसेच आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली. वाडेगाव पोलिस चौकीसमोर झालेल्या या सभेत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांतता व सामाजिक सलोखा टिकवण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सण-उत्सव हे समाजात आनंद, एकोपा आणि बंधुभाव निर्माण करणारे असतात. मात्र हे सण साजरे करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये, तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित करू नयेत, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
तसेच सणांच्या काळात मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम किंवा सार्वजनिक उपक्रम आयोजित करताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. ध्वनीप्रदूषण टाळावे, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी आणि कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी परस्परांच्या भावना जपून शांततेत सण साजरे केल्यास परिसरात सौहार्दाचे वातावरण कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Related News
बाळापूर तालुक्यात रोहीचा हैदोस ; अळोशी–कळोशी शिवारात ३ एकर गहू पीक उद्ध्वस्त
महाशिवरात्री 2026 : शिवलिंग पूजन आणि उपवासाचे फायदे जाणून घ्या
अकोला मतदान केंद्रावर किरकोळ वाद; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात, शांततेत मतदान सुरू
2026: मध्ये ड्राय डे: जाणून घ्या कोणत्या दिवशी दारूची दुकाने राहणार बंद
वाघळुद ते शेगाव पायदळ दिंडीचे शिवनेरी कॉलनीत जल्लोषात स्वागत
गीत गायनातून जेष्ठ पत्रकार किशोर अवचार यांना आदरांजली!
वृद्ध मातेच्या मृत्यूनंतर नेत्रदानाने दिला समाजसेवेचा संदेश
विद्यार्थ्यांच्या विकासासाठी निंबा विद्यालयात पालक सभा आयोजित
मित्राच्या वादात मध्यस्थी करताना जागीच मृत्यू
24 वर्षीय गौरव बावस्कारची निर्घृण हत्या
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा : जीवनकार्य व आदिवासी योगदानाची शाळांमध्ये केली महत्त्वपूर्ण ओळख
सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून उपसरपंच राजेश्वर पळसकार आणि तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सागर सरप उपस्थित होते. त्यांनीही गावातील नागरिकांनी एकत्र येत शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
या बैठकीला प्रकाश कंडारकर, मोहम्मद अफतार, शामलाल लोध, प्रमोद डोंगरे, इब्राहिम पेंटर, दिनेश धाडसे, गणेश कुंडारकर, नितीन मानकर, अंकुश शहाने, चंदन जंजाळ, योगेश कंडारकर, रुपेश जंजाळ यांच्यासह पोलिस चौकीचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सागर सरप यांनी केले. या शांतता समितीच्या सभेमुळे आगामी सण-उत्सव सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
