अकोला शहरातील पोळा चौक परिसरात असलेल्या महापालिकेच्या उच्च प्राथमिक उर्दू कन्या शाळा क्रमांक ३ येथील मतदान केंद्रावर आज मतदानादरम्यान काही उमेदवारांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाल्याची घटना घडली. मतदान केंद्राच्या परिसरात उमेदवार फिरत असल्याचा आरोप एकमेकांवर करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मतदान केंद्राच्या ठरवून दिलेल्या परिघात उमेदवार किंवा त्यांचे समर्थक उपस्थित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यावरून संबंधित उमेदवारांमध्ये शाब्दिक वाद झाला. मात्र घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत मध्यस्थी केली आणि गैरसमज दूर केल्याने हा वाद लगेचच निवळला.
या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने मतदान केंद्राच्या सुरक्षेत वाढ केली आहे. मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराची चौकशी करूनच त्यांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जात आहे. तसेच मतदान केंद्राच्या परिसरात अनधिकृतरीत्या कोणीही थांबणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जात आहे.
Related News
अकोट, दि. : आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. पोलीस अधिकारी आ...
Continue reading
पश्चिम बंगाल व तमिळनाडू निवडणूक 2026: मतदानाचा महासंग्राम सुरू, सकाळी 9 वाजेपर्यंत 18.76% मतदान नोंद
भारताच्या लोकशाहीतील सर्वात मोठ्या राजकीय प्रक्रियांपैकी एक असलेल्या पश्चिम बं...
Continue reading
गोरेगाव ड्रग्स प्रकरणात मोठा ट्विस्ट! तरुणीच्या जबाबानंतर पोलिसांची धडक कारवाई; दरवाजा तोडून आरोपीला अटक
मुंबईतील Goregaon परिसरात उघडकीस आलेल्या ड्रग्स प्रकरणाने मो...
Continue reading
Kim Jong Un 99.93% मतांचा कौल, विरोधात फक्त 0.07% मतं; उत्तर कोरियातील निवडणुकीचा अनोखा ‘लोकशाही’ नमुना
उत्तर कोरिया म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो हुकूमशाह...
Continue reading
बाळापूर : तालुक्यातील वाडेगाव येथे महाशिवरात्री तसेच आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्...
Continue reading
उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक; राज्य निवडणूक आयोग सज्ज
उद्या मतदान : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी उद्या (7 फेब्रुवारी 2026) म...
Continue reading
PM Narendra Modi: बोटावरील शाई हेच सन्मानचिन्ह! राष्ट्रीय मतदार दिनी पंतप्रधानांचा मतदार राजाला मोठा संदेश
भारतीय लोकशाहीच्या उत्सवात मतदार हा खरा नायक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखि...
Continue reading
Big Change in ZP Elections : मार्कर ऐवजी ‘इंडिलेबल शाई’, मतदान अधिक सुरक्षित होणार
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसंदर्भात Elections आयोगाने मोठा निर्ण...
Continue reading
Maharashtra Elections 2026 : मतदानानंतर शाई पुसली जात असल्याचे आरोप; Uddhav Thackeray अडचणीत?
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. परंतु मतदानाच्या दिवशीच शि...
Continue reading
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचा जोरदार वातारवण आहे. यामध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित होण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, अकोला महानगरपालिकेच्या निव...
Continue reading
मतदारांसाठी मोठी बातमी; मार्करने लावलेली शाई लगेच पुसतेय? voting प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज सकाळपासून voting प्रक्रियेला सुरुवात झा...
Continue reading
पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा वाद अत्यंत किरकोळ स्वरूपाचा होता आणि कोणताही गंभीर प्रकार घडलेला नाही. सध्या संबंधित मतदान केंद्रावर पूर्णतः शांततेत आणि सुरळीतपणे मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
“मतदान केंद्रावर झालेला वाद हा किरकोळ स्वरूपाचा होता. पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे.”
सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला
read also : https://ajinkyabharat.com/aamir-khan-productions-romantic-love-story-ek-din-sai-pallavis-bollywood-debut-first-look-viral/