ऑपरेशन प्रहारची दमदार कारवाई

अवैध गॅस रिफिलिंग रॅकेट उद्ध्वस्त दोघे अटकेत

अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अवैध गॅस रिफिलिंग करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून ३७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस स्टेशन अकोट फाइल हद्दीतील अकोट रोड, ग्रीन पार्कसमोर, लक्ष्मी कॉलनी परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरणे सुरू असल्याचे समोर आले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंचांसह धाड टाकली.

छाप्यात फारुख खान आयुब खान (५२)सैयद फरहान सैयद वजीओदिन (१९), दोन्ही राहणार अकोला, यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी हे घरगुती सिलिंडरमधून इलेक्ट्रिक मोटर पंप, प्लास्टिक नळ्या व नॉझलच्या सहाय्याने ऑटो रिक्षामध्ये गॅस भरत असल्याचे आढळून आले. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून कोणत्याही क्षणी स्फोट होऊन मोठ्या दुर्घटनेची शक्यता असल्याने तत्काळ कारवाई करण्यात आली.

Related News

जप्त मुद्देमाल –

  • HP व भारत गॅसचे १९ घरगुती सिलिंडर (भरलेले व रिकामे)

  • २ गॅस रिफिलिंग मशीन

  • प्लास्टिक नळ्या व नॉझल

  • २ इलेक्ट्रिक वजन काटे

  • एकूण किमत : ₹३७,५००

या प्रकरणी आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.अकोला पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर आणि धोकादायक गॅस रिफिलिंग व्यवसायावर मोठा दणका बसला आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/gold-silver-price-explosion-2025-7-big-shocking-changes/

Related News