ऑपरेशन प्रहार: अकोट ग्रामीण भागात जुगार अड्ड्यावर धाड,1,82,500 रु. जप्त

ऑपरेशन प्रहार

अकोट अकोला रोडवरील होटेल सागवानच्या मागील जुगार अड्ड्यावर ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीसाची धाड, ९ जुगाराडूंसह ५२ तास पत्ते, नगदी २२,५०० रु. आणि ५ मोटरसायकल जप्त.

उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट तसेच पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण यांची संयुक्त कार्यवाह पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण हददीत उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांचे पथक तसेच पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथील पो.स्टाफ पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की अकोट अकोला रोडवरील होटेल सागवानच्या मागे काही ईसम तीन पानी परेल नावाचा जुगार खेळत आहेत.अशा गोपनीय माहिती वरून सदरची माहिती सहायक पोलीस अधिक्षक निखील पाटील यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टॉफ व पंचासह जुगार रेड केली असता.एकुण ९ ईसम जुगार खेळतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष त्यांना नाव गाव विचारले असता. त्यांनी त्यांचे नाव १) मुरलीधर खंडुजी खंडारे २) विशाल सुधाकर रोडे ३)श्रीकृष्ण बळीराम गावंडे ४)मंगेश दिनकर गवळी ५)पुरुषोत्तम अरूण भाकरे ६)अजय किसन डोंगरे (७) नईमोददीन हसनोददीन ८)आकाश प्रभाकर ढोकणे ९) हरिष देविदास बोदडे असे सांगीतले.त्यांचेजवळुन घटनास्थळावरून पंचासमक्ष ५२ तास पत्ते,नगदी २२,५००/रू तसेच पाच मोटरसायकल किंअं १,६०,०००/रू असा एकुण १,८२,५००/रू मुददेमाल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतले.लेखी फिर्यादवरून पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा.अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांचे आदेशान्वये ऑपरेशन प्रहार अतंर्गत मा.अप्पर पोलीस अधिक्षक,श्री.बी.चंद्रकांत रेडडी,मा.सहा.पोलीस अधिक्षक निखील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे,पोहेकों शिवकुमार तोमर,पोकों राहुल कांबळे,पोकॉ विजय तायडे,पोकॉ रामेश्वर घंगाळ,पोकों योगेश डोबराव,पोकॉ आकाश घायल,पोकॉ राहुल ठाकुर यांनी केली.

read also : https://ajinkyabharat.com/crack-free-joyous-diwali-matoshree-vriddha-shramat/

Related News

Related News