सध्याच्या काळामध्ये आपण अनेक तास ऑफिसमध्ये काम करत असतो.
कामाचा ताण आणि थकवा यामुळे कधी कधी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये डुलकी किंवा थोडा वेळ झोप लागण्याची शक्यता असते.
सध्याच्या काळामध्ये आपण अनेक तास ऑफिसमध्ये काम करत असतो.
Related News
कामाचा ताण आणि थकवा यामुळे कधी कधी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये डुलकी किंवा थोडा वेळ झोप लागण्याची शक्यता असते.
मात्र अशी डुलकी घेणे किंवा पॉवर नॅप घेणे कर्मचाऱ्यांना भीतीचे वाटते,
बॉसने पाहिले तर अडचण निर्माण होऊ शकते म्हणून अनेक जण थकवा आलेला असताना देखील डुलकी घेणे टाळतात.
आपल्याला कामावरून काढले जाऊ शकते अशी भीती वाटत असते.
मात्र आता तुम्हाला ऑफिसमध्ये कामाच्या वेळेस डुलकी लागली तरी घाबरण्याचे कारण नाहीये.
यासाठी कर्नाटक हायकोर्टाने एक प्रकरणात दिलेला निकाल आपण जाणून घेऊयात.
कर्नाटकमधील एका पोलिस हवालदाराचा कामाच्या वेळेस डुलकी घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
त्यानंतर कामाच्या वेळेत असे केल्यामुळे त्या पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले होते.
निलंबित केल्याने त्याने हवालदाराने कर्नाटक हायकोर्टात धाव घेतली होती आणि दाद मागितली.
यावर हायकोर्टाने आपला निकाल दिला आहे.
भारतीय संविधानानुसार लोकांना झोपण्याचा आणि आराम करण्याचा अधिकार आहे.
वेळोवेळी आराम आणि झोपेचे आयुष्यात महत्व असल्याचे हायकोर्टाने निकालात सांगितले आहे.
कायदा काय सांगतो?
मानवधिकाराच्या कायद्याच्या कलम 24 नुसार, कामाच्या ठिकाणी कामावर असताना देखील आराम
आणि सुट्ट्या घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे.
ज्यात कामाच्या तासांची योग्य वेळ आणि पगारासह सुट्ट्यांचा समावेश आहे.
कामाच्या दिवसांमध्ये दिवसाला 8 तास आणि आठवड्याला 48 तासांपेक्षा
जास्त वेळ काम नसावे असे कायद्यात म्हटले आहे. काही परिस्थितीत हा नियम अपवाद असू शकतो.
काय आहे प्रकरण?
निलंबित होण्याआधी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळात काम करणाऱ्या एका हवालदाराने
सलग 2 महीने 16 तास सलग शिफ्ट केली होती. त्यावलेस कामावर असताना त्याला काही वेळासाठी डुलकी लागली.
यामुळे त्याला निलंबित करण्यात आले. त्यानंतर या हवालदाराने हायकोर्टात धाव घेतली होती.
डुलकी लागली म्हणून निलंबित करणे हे योग्य नसल्याचे या हवालदाराने आपल्या याचिकेत म्हटले होते.
यानंतर हायकोर्टाने केकेआरटीसीचा हा निर्णय रद्द केला. तसेच परिवहन विभागाला चांगले खडे बोल सुनावले.
हवालदाराला विना विश्रांती दोन शिफ्टमध्ये काम लावणे ही प्रशासनाची चूक असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे.
हायकोर्टाचा आदेश काय?
निलंबित केलेल्या हवालदाराला निलंबित काळातील वेतन आणि अन्य इतर लाभ देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
याचिकाकरता एकाच शिफ्टमध्ये काम करताना असताना झोपला असतं टर ती त्याची चूक होती.
मात्र विनय ब्रेक दोन महीने त्याला 16 तास काम करण्यास भाग पाडले गेले.
कामाच्या ताणामुळे त्यांना दोन शिफ्टमध्ये काम करावे लागत होते.
त्यामुळे एक दिवस त्याला डुलकी लागली म्हणून निलंबन करणे हे योग्य ठरत नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे.
Read more here : https://ajinkyabharat.com/abu-azmi-suspension-abu-azhmi-yancha-vidhansabhetun-suspension-aurangzeb-sublime-case/