समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले.
यावरुन आता विधीमंडळामध्ये एकमताने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये मोठी घडामोड घडत आहे.
Related News
CJP आता राजकारणात उतरणार? भाजपसह काँग्रेसचंही टेन्शन वाढणार; नेत्यांनी स्पष्टच सांगितलं!
नितीन गडकरींच्या अडचणीत वाढणार? E20 पेट्रोलविरोधात 4 ऑगस्टला थेट संसदेवर मोर्चा
काँग्रेसच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी निर्णय; 2028 ची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर
145 किमी वेगाच्या चक्रीवादळाचा चीनला तडाखा; लाखो लोकांचे स्थलांतर, हाय अलर्ट जारी
कापलेली फळे लगेच काळी पडतात? ‘हे’ 5 घरगुती उपाय करा, फळे राहतील ताजी
मोदींच्या निवासस्थानी घातपाताचा प्रयत्न? एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर गंभीर आरोप, म्हणाले…
कच्च्या तेलाचा भाव पुन्हा 100 डॉलरच्या जवळ; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार का?
धर्मेंद्र प्रधानांनी 15 दिवस आधीच राजीनामा द्यायला हवा होता; छगन भुजबळांचा मोठा दावा
EPFO : नोकरी संपली तरी PF खात्यावर व्याज मिळतंय? जाणून घ्या EPFOचा हा महत्त्वाचा नियम
चविष्ट आणि पौष्टिक आहारासाठी पनीरपासून बनवा ‘या’ 5 सोप्या रेसिपी; आरोग्यासाठीही फायदेशीर
ठाकरे बंधूंची ‘लंच डिप्लोमसी’; उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर, दोन तास चर्चा… राज्याच्या राजकारणात काय घडतंय?
IND vs PAK: भारताने पुन्हा पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केलं; फायनलमध्ये 3-1 ने धुवून काढत जिंकलं सुवर्णपदक
समाजवादी पक्षाचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांचे विधानसभेतून निलंबन करण्यात आले आहे.
आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक करणारे वक्तव्य केले होते. यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील जोरदार टीका केली होती.
भाजपा आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील अबू आझमी यांना निलंबित करण्यात यावे असा प्रस्ताव मांडला.
हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे अबू आझमी हे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निलंबित असणार आहेत.
औरंगजेबाचे उदात्तीकरण प्रकरण हे अबू आझमी यांना भोवले आहेे.
काय म्हणाले होते अबू आझमी?
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले. ते म्हणाले की,
“देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे.
औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं बांधली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता.
त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती,” असे अबू आझमी यांनी सांगितले.
यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादाला तोंड फुटले आहे.
अबू आझमी यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.
मात्र त्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या एकमताने अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलं आहे?
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले.
यामुळे विधीमंडळामध्ये त्यांच्या निलंबनासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला.
भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव ठेवला. यावेळी ते म्हणाले की,
अध्यक्ष महोदय मी असा प्रस्ताव मांडतो की अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब उत्तम प्रशासक होता
असं त्याची भलामण करणारे आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.
ही त्यांची वक्तव्यं आक्षेपार्ह आहेत. त्यांची वक्तव्यं निषेधार्ह आहेत. यामुळे सभागृहाचा अपमान झाला आहे.
अबू आझमींनी विधानसभेची प्रतिमा मलीन केली. त्यामुळे ही विधानसभा असा ठराव करते आहे की अबू
आझमी यांचं सदस्यत्व अर्थसंकल्प अधिवेशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत निलंबन करावे, असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला.

