ओबीसी उपवर्गीकरणाबाबत विश्वकर्मीय सुतार बांधवांचे निवेदन

न्या.रोहिणी आयोग लागू करा विश्वकर्मीय समितीची मागणी

मा.ना.श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना महाराष्ट्र राज्य, विश्वकर्मीय समाज समन्वयक समिती व विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था तर्फे अकोट तहसील कार्यालय येथे (दि.२४ ) माननीय तहसीलदार चव्हाण साहेब यांच्या मार्फत निवेदन दिले.ओबीसी प्रवर्गातील विश्वकर्मीय समाज जातीसमूहाच्या आरक्षण विषयक संविधानिक मागण्याबाबतचे निवेदन यावेळी सुतार बांधवाकडून देण्यात आले.आपल्या भावी पिढीच्या जाती आधारित भेदभाव, शिक्षण, रोजगाराच्या संधी मध्ये मर्यादित प्रवेश आणि आर्थिक अडचणी दूर करण्या करिता निवेदन देण्यासाठी विश्वकर्मीय समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तर्फे व आकोट येथील विश्वकर्मीय सुतार समन्वय समिती आणि विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था सावरा चे समाज बाधव वतीने निवेदन देण्यात आले.ओबीसींना 27 टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला परंतु आजही ठराविक जाती समूह, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागे असल्याचे समोर येत आहे त्यामुळे सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक पैलूचा विचार करून आरक्षणाचे समन्यायी पुनर्वितरण होणे आवश्यक असल्याचे समितीचे म्हणणे आहे.असे समितीचे मुख्य प्रशासकीय व राज्य समन्यवक विद्यानंद मानकर यांनी सांगितले.निवेदन देते वेळी प्रमुख नरेश पुनकर ,नितीन हातेकर, गणेश पुनकर आसेगाव, संतोष पुनकर,यशवंत सामतकर , गणेश पुनकर अकोट ,विठ्ठल पुनकर, संतोष जामोदकर ,गणेश पुनकर सावरा राधेश्याम येऊलकर. प्रणव पुनकर,देवेंद्र पुणकर ,सार्थक आकोटकर,राजू बाळापुरे, चेतन आवारकर, शुभम पुनकर ,भूषण सामतकर ,श्रीराम पुनकर यावेळी उपस्थित होते.

read also : https://ajinkyabharat.com/yet-nahi/

Related News