आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता मा.साहेब जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात व श्रद्धेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे कार्यालय, निंबा फाटा (संघ भूमी, हाता फाटा) येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मेजर दिलीप सरदार होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निंबा फाटा येथील प्रतिष्ठित नागरिक व उद्योजक किसन भाऊ राऊत हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे धूप-दीप पूजन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली.
यावेळी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला दबंग पत्रकार देवराव परघरमोर, माजी पोलीस पाटील सारंगधरजी घ्यारे, विनोद घ्यारे, माजी उपसरपंच व माजी सरपंच देवमन भाऊ वानखडे, पत्रकार संजय इंगळे, विनोद भारसाकडे, माजी उपसरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष गणेश वानखडे, वजेगाव येथील सुरज इंगळे, डोंगरगाव बहादूर, तसेच वंचित बहुजन आघाडीचे कट्टर कार्यकर्ते सुभाष भाऊ घ्यारे, हॉटेल राणा सर्वेसर्वा आदी प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
Related News
दीपक पाटील दांदळे यांना पुण्यात ‘हिंदूरत्न’ पुरस्काराने सन्मानित!
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सामाज...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील ३० कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा ‘अकोलारत्न’ पुरस्काराने गौरव; विशेष पुस्तकाचे प्रकाशन!
स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशनचा अभिनव उपक्रम; शैक्षणिक, सामाजिक, ...
Continue reading
राम माधव ISIच्या निवृत्त अधिकाऱ्यांना भेटले? प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; चार मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसे...
Continue reading
कुरणखेडच्या गजानन महाराज विद्यालयाचा कायापालट! 10 हून अधिक भौतिक सुविधांचे दिमाखात लोकार्पण
कुरणखेड : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत कुरणखेड येथील गजानन महाराज विद्यालयात शैक्षणिक ...
Continue reading
अमित शाह यांच्या भेटीला सुनेत्रा पवार; पुण्यात राजकीय घडामोडींना वेग, काँग्रेस-वंचित आंदोलनामुळे वातावरण तापले
पुणे दौऱ्यात अमित शाह-सुनेत्रा पवार भेट, काँग्रे...
Continue reading
Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदला कुठे कडकडीत तर कुठे संमिश्र प्रतिसाद; अनेक ठिकाणी कार्यकर्ते ताब्यात, जाणून घ्या राज्यातील स्थिती
Vanchit Maharashtra Bandh ...
Continue reading
Maharashtra Bandh : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद; प्रकाश आंबेडकरांकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, साडेतीन हजार कार्यकर्ते ताब्यात
Maharashtra News : दिल्लीतील वि...
Continue reading
अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या संघटन विस्ताराला चालना देण्यासाठी टॉवर चौक येथील पक्ष कार्यालयात ऑफलाईन सभासद नोंदणी अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. अभियानाच्या पहिल्याच दिवश...
Continue reading
अमरावती विधान परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; काँग्रेस उमेदवाराला 0 मत, प्रवीण पोटेंचा मोठा गौप्यस्फोट
अमरावती : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत ...
Continue reading
पातुर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि निवडणूक सचिव सुरेश काकाणी यांनी गुरुवारी (४ जून) पातुर येथे भेट देऊन निव...
Continue reading
अकोट : तालुक्यातील बोर्डी, शिवपूर, रामापूर परिसरात मान्सूनपूर्व कपाशी लागवडीला वेग आला आहे. सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या भागांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर कपाशी लागवड करीत असून ठि...
Continue reading
बेलखेड गावाजवळ शिरलेल्या अस्वलामुळे खळबळ; वन विभागाच्या थरारक मोहिमेनंतर अखेर जेरबंद
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलखेड गावाजवळील शेत परिसरात अस्वल शिरल्याने बुधवारी सक...
Continue reading
कार्यक्रमात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा, त्यागाचा व शिवरायांच्या घडणीत त्यांच्या मोलाच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. उपस्थित वक्त्यांनी जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांवर प्रकाश टाकत समाजाने त्यांच्या आदर्शांचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक व सांस्कृतिक जागृतीचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध आणि अतिशय उत्साहात पार पडला. पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती सोहळ्याला यशस्वी केले.
read also : https://ajinkyabharat.com/celebration-of-rajmata-jijau-and-swami-vivekananda-jayanti-at-lohari-khurd/#google_vignette