कोरपणा तालुक्यातील नांदा ग्रामपंचायतीचा गृहकर व पाणीकर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात थकीत असून अनेक नागरिकांनी सलग तीन, चार, अगदी पाच वर्षांपासूनही कराचा भरणा केलेला नाही. या थकबाकीमुळे ग्रामपंचायतीच्या नियमित आर्थिक कारभारावर मोठा परिणाम होत असून कर्मचाऱ्यांचा पगार, दैनंदिन साफसफाईची कामे यांसारख्या अत्यावश्यक उपक्रमांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सामान्य निधीत पैसे उपलब्ध नसल्याने अनेक आवश्यक कामे प्रलंबित राहिली आहेत.
ग्रामपंचायतीकडून सध्या घरोघरी जाऊन कर वसुलीचा उपक्रम सुरू आहे. नागरिकांनी सहकार्य करून कराचा भरणा करावा, अशी विनंती ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे. गावातील कर वसुली सुरळीत व्हावी यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी वार्डात जाऊन ग्रामस्थांशी बैठक घेणे आणि कर भरण्याचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक असतानाही या पातळीवर अपेक्षित हालचाल होताना दिसत नाही, अशी ग्रामस्थांत नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीतर्फे गावातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या कडे थकीत असलेले गृहकर व पाणीकर स्वतःहून ग्रामपंचायत कार्यालयात जमा करून सहकार्य करावे.
Related News
5000 कोटींच्या दाव्यावरून लाडकी बहीण योजना चर्चेत; सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल, ‘खरी आकडेवारी कोणती?’
लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा ...
Continue reading
Disha Salian मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’
गेल्या सहा वर्षांपासून राजकीय हेतूने नाव जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आदित्य...
Continue reading
रुग्णालयांकडून वैद्यकीय वस्तूंवर मोठा नफा? Tukaram Mundhe यांच्या पत्रामुळे खळबळ; काही वस्तूंवर तब्बल २८४१ टक्क्यांपर्यंत फरक
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त
Continue reading
शरद पवार मैदानात! ऐन गणेशोत्सवात राष्ट्रवादीची तातडीची बैठक; दुष्काळ, जरांगे आंदोलनावर होणार चर्चा
राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच
Continue reading
Manoj Jarange Patil मुंबई आंदोलन : तिसऱ्या अर्जावर निर्णय रखडला; हायकोर्टात जाण्याची शक्यता, पोलिसांच्या विशेष बैठकीत काय घडलं?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
Continue reading
शिवसेना चिन्ह सुनावणी : शिंदे गटाच्या वकिलांचा भावनिक युक्तिवाद; ‘कार्यकर्ते हेच पक्षाचा प्राण’ म्हणत ठाकरे गटावर निशाणा
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत नीरज कौल यांचा जोरदार युक्त...
Continue reading
खात्यात अचानक पैसे आले… आणि अचानक गेले? सायबर फ्रॉडवर RBIचा मोठा वार; संशयास्पद व्यवहारांवर लागणार ‘डेबिट होल्ड’
RBI : डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर पाहता...
Continue reading
मुंबईतील मराठा मोर्चापूर्वी संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; ‘सरकारला जी भाषा कळते ती वापरा’
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील १९ सप्...
Continue reading
शी जिनपिंग भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा; 6 वर्षांनी दिल्ली-ग्वांगझोऊ विमानसेवा पुन्हा सुरू
भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये गेल्या काही काळापासून...
Continue reading
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांना हात लावाल तर… अभिजीत दिपकेंचा सरकारला ओपन चॅलेंज; म्हणाले, “महाराष्ट्र इथं येईल!”
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
Continue reading
अनेक राज्यांच्या दरडोई उत्पन्नापेक्षाही महागडा iPhone Duo; किंमत तब्बल 4.49 लाखांपर्यंत
Apple ने आपल्या प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये मोठी झेप घेत पह...
Continue reading
यासोबतच यशोधन विहारवर असलेली तब्बल १६ लाख रुपयांची थकबाकी सुद्धा ग्रामपंचायतीसमोर मोठी समस्या बनली आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी यशोधन विहारच्या प्रोपायटर पौर्णिमा श्रीवास्तव यांच्याशी संवाद साधून थकबाकीची रक्कम प्रेमाने व नियमांनुसार वसूल करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
ग्रामपंचायतीच्या आर्थिक शिस्तीसाठी आणि गावाच्या विकासासाठी कर भरणे अत्यावश्यक आहे. नांदाच्या सर्व नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करून आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/importance-of-skills-in-ai-era-instagram-ceo-adam-mosseri-said-what-is-necessary-to-be-successful/