दीपिका पदुकोणचा हा ड्रेस गौरी आणि नैनिका या डिझायनर्सनी डिझाइन केला होता.
दीपिका पादुकोणचा हा पिवळ्या रंगाचा ड्रेस विकला गेला आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
Related News
Lalbaugcha Raja 2026 :लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी; दर्शनाची रांग 10 किलोमीटरपार
Lalbaugcha Raja 2026 : मुंबईतील प्रसिद्ध आणि कोट्यवधी गणेशभक्तांचे श्...
Continue reading
७ दिवसांत माफी मागा, अन्यथा ५०० कोटींचा दावा! मातोश्रीबाहेरच स्वीकारली नोटीस; Satish Salian–आदित्य ठाकरे वाद चिघळला
Disha Salian मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकार...
Continue reading
Samay Rainaने नवाजुद्दीन सिद्दिकीला केलं रोस्ट; ‘Sacred Games’चा संदर्भ देत म्हणाला, ‘ड्रग्स घेऊन, दारू प्यायल्यानंतर सेटवर...’
Samay Raina On Nawazuddin Siddiqui : कॉमेडियन समय र...
Continue reading
लालबागच्या राजाच्या चरणी Ranveer Singh नतमस्तक; १ हजार मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा संकल्प
अभिनेता Ranveer Singh साठी यंदाचा काळ अनेक कारणांनी खास ठरत आहे. गणेशोत्सवाच्या पा...
Continue reading
135 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात ED ची मोठी कारवाई; मुंबई-छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा ठिकाणी छापे
छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 135 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात अं...
Continue reading
‘Dhurandhar’ पाहिलास का? 9 महिन्यांनंतर शाहरुख खान स्पष्टच बोलला; रणवीर सिंहच्या चित्रपटाचं केलं कौतुक
‘Dhurandhar’ पाहिलास का? शाहरुख खानने अखेर दिलं उत्तर : बॉलिवूडचा किंग खान अ...
Continue reading
421 दिवसांपासून OTT टॉप 10 मध्ये ‘Mirzapur’; मोठ्या पडद्यावरही फ्रँचायझीची दमदार वाटचाल
दमदार संवाद, लक्षवेधी व्यक्तिरेखा, सत्तासंघर्ष आणि गुन्हेगारी विश्वाच्या पार्श्वभूमीवर उभी ...
Continue reading
Instagram चे नवे फीचर; टॅग केलेले आवडते फोटो आता थेट प्रोफाइल ग्रिडवर दाखवा, जाणून घ्या कसे वापरायचे
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram आपल्या यूजर्सचा अनुभव अधिक चांगला आणि वैयक्ति...
Continue reading
सीजेपी नेत्याचे सरकारवर गंभीर आरोप; सोशल मीडिया कंपन्यांवर दबाव असल्याचा दावा
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी केंद्र सरकार आणि सोशल मीडिया कंपन्यांवर ग...
Continue reading
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्...
Continue reading
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला का? राज ठाकरेंचा थेट सवाल; कलाकारांना केलं आवाहन
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरस्कार सोहळा दिल्ल...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. गरोदर दीपिका नुकतीच एका कार्यक्रमासाठी पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घालून गेली होती. या ड्रेसची विक्री करण्यात आली
आहे. दीपिकाचा हा ड्रेस हजारो रुपयांना विकला गेला आहे, अभिनेत्रीने यासंदर्भात तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहे.
नुकताच दीपिका पादुकोणने आउटिंगसाठी घातलेला पिवळा लाँग गाऊन ड्रेस तुम्हाला आठवत असेल.
दीपिकाने या ड्रेसमध्ये खूप सुंदर फोटोशूट केलं होतं. तिने हा ड्रेस घालून एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
तिचा हा ड्रेस गौरी आणि नैनिका या डिझायनर्सनी डिझाइन केला होता. हा ड्रेस लिलावासाठी ठेवण्यात आला होता.
हा ड्रेस विकल्यानंतर आलेले पैसे चांगल्या कामासाठी दान करण्यात करण्यात आले आहेत.
दीपिका पादुकोणचा पिवळा ड्रेस ३४ हजार रुपयांना विकला गेला. ही रक्कम अभिनेत्रीच्या लिव्ह लव्ह लाफ
फाऊंडेशनला मदतीसाठी देण्यात आली आहे. दीपिकाने या ड्रेसमधील तिचा एक छानसा व्हिडीओ शेअर केला होता,
पण या ड्रेसची किंमत व्हिडीओत देण्यात आली नव्हती. आता तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर या ड्रेसमधील एक फोटो शेअर केला आहे,
ज्यावर ‘सोल्ड आउट’ असं लिहिलं आहे.
मतदानाच्या दिवशी दिसला दीपिकाचा बेबी बंप
दीपिका पदुकोण त्यापूर्वी मतदानासाठी घराबाहेर पडल्यावर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली होती. २० मे रोजी मुंबईत लोकसभा निवडणुकांसाठी मतदाना पार पडलं.
त्यादिवशी रणवीर व दीपिका दोघे कारने मतदान केंद्रावर पोहोचले होते. त्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
रणवीर व दीपिका पांढरे शर्ट व डेनिम पँट अशा लूकमध्ये मतदानासाठी आले होते. यावेळी दोघांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
या गर्दीतून वाट काढत रणवीरने गरोदर दीपिकाला कारपर्यंत पोहोचवलं होतं.
दीपिका- रणवीर सप्टेंबर महिन्यात करतील बाळाचं स्वागत
दरम्यान, रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांनी २९ फेब्रुवारी २०२३ रोजी ते आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती.
दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने ‘सप्टेंबर २०२४’ असं लिहिलं होतं. पोस्टमध्ये तिची व रणवीरची नावं होतं
. या पोस्टमध्ये लहान बाळाचे कपडे व खेळण्यांचे चित्र होते. रणवीर व दीपिका दोघेही लग्नानंतर सहा वर्षांनी आई-बाबा होणार आहेत.
दोघेही सप्टेंबर २०२४ मध्ये पहिल्या बाळाचं स्वागत करतील ..