नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी हे यंदाची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून लढवणार आहेत. नेहरु-गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जाणारा हा लोकसभा मतदारसंघ राहुल यांच्या ‘मातोश्री’ सोनिया गांधी यांनी सोडला होता. त्यानंतर राहुल गांधी येथून रिंगणार उतरणार असल्याचं पक्षातर्फे तीन मे रोजी जाहीर करण्यात आले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधींना गमवाव्या लागलेल्या अमेठी मतदारसंघातून गांधी कुटुंबाचे निष्ठावंत किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने दोन्ही जागांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असलेल्या तीन मे रोजी उमेदवारांची नावे जाहीर केली. यामुळे उमेदवारांबद्दल आठवडाभरापासून चाललेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
Related News
शेतकऱ्यांना एका रुपयात पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय’,
असा प्रश्न आमदार नाना पटोले यांनी शनिवारी उपस्थित केला.
तसेच, कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी यावेळी केली....
Continue reading
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री घडलेल्या
चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तर अनेकजण जखमी झाले आहेत.
स्थानकावर प्रयागराजला निघालेल्या प्...
Continue reading
आतापर्यंत साप साप म्हणून भुई थोपटणारे भाजपा आमदार सुरेश धस
गेल्या दोन दिवसात पुरते अडचणीत सापडले आहे.
विरोधकांच्या आरोपानुसार,
बीडमध्ये धनंजय मुंडेंविरोधातील त्यांची भूमिकाच स...
Continue reading
Delhi Election Result 2025 : दिल्लीतील मुस्लीम विधानसभा मतदारसंघात देखील भाजपचा डंका पाहायला मिळत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (दि. 08) सकाळी आठ वाजेपासून सु...
Continue reading
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्ला
Manoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा
...
Continue reading
वायनाड: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी – वाड्रा बुधवारी (23 ऑक्टोबर) वायनाड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या काल...
Continue reading
काँग्रेस कार्यालयाबाहेर भयाण शांतता
मुंबई : हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांवर सध्या मतमोजणी सुरू आहे. निकालात सुरुवातीला काँग्रेसने (congress)प्रचंड आघाडी घेतली होती.
&nbs...
Continue reading
अकोला शहरात निवडणुकीपूर्वी पोस्टरबाजीला ऊत
अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राजकारण चांगलंच तापलं आहे.
काँग्रेस विरोधात अकोल्यात पुन्हा पोस्टरबाजी करण्यात आली...
Continue reading
कारंजा (रम)/ बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा ( रम) शेत शिवारातील शेतकरी
भास्कर बळिराम क-हे यांनी मागिल ३१ जुलै रोजी शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले
असल्याची ऑनलाइन तक्रा...
Continue reading
नागपूर विभागात जिल्हा प्रथम
गोंदिया : केंद्र व राज्य पुरस्कृत या दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली असून योजनेच्या
अंमलबजावणीत गोंदिया...
Continue reading
ईडी कार्यालयांना घेराव घालणार
प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने २२ ऑगस्ट रोजी देशभरातील
अंमलबजावणी संचालनालय कार्यालयांना घेराव घालण्याची घोषणा
केली आहे. मंगळवारी दिल्लीत झाले...
Continue reading
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून राहुल गांधी आक्रमक
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे.
या अधिवेशनात काँग्रेसेचे नेते तथा विरोधी पक्षनेत्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
...
Continue reading
रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मतदान होणार आहे. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये जिंकलेल्या केरळच्या वायनाड मतदारसंघातून आधीच निवडणूक लढली आहे. वायनाडमध्ये २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते.
भारतीय जनता पक्षाने दोन मे रोजी उत्तर प्रदेशातील मंत्री दिनेश प्रताप सिंग यांना रायबरेलीमधून उमेदवार घोषित केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना सोनिया गांधींकडून पराभवाची धूळ चारण्यात आली होती.
१९९९ पासून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सलग काँग्रेस अमेठी आणि रायबरेलीची जागा जिंकत आली होती, परंतु गेल्या वेळी राहुल गांधी यांचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून अमेठीत पराभव झाला. राहुल २००४ पासून अमेठीत जिंकत होते. भाजपने पुन्हा एकदा अमेठीतून इराणी यांना उमेदवारी दिली आहे.
२००४ पासून रायबरेलीची जागा राखत आलेल्या सोनिया गांधी यांनी २०२४ मध्ये लोकसभेच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस हा समाजवादी पक्षासोबत आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवत आहे. काँग्रेसला यूपीमधून ८० पैकी १७ जागा मिळाल्या आहेत तर उर्वरित जागा समाजवादी पक्ष आणि इंडिया आघाडीतील इतर मित्र पक्षांमध्ये वाटल्या गेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सातपैकी शेवटचा टप्पा १ जून रोजी होणार आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.