जे समाजाला अपेक्षित आहे तेच होणे महत्वाचे आहे. केवळ गर्दी
जमली की परिवर्तन होतं असं नाही. प्रत्यक्षात गाठी-भेटी होतं राहतात.
त्यातून निर्णय होणे महत्वाचे आहे. परिणामी हल्ली इतके भावी आमदार
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
झाले आहेत की मला निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघच शिल्लक
राहिला नाही. असा मिश्किल टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला
आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील
निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहेत.
याबाबत येत्या 30 ऑक्टोंबर ला अंतरवाली सराटी येथे बैठक पार पडणार
आहे. या बैठकीअंती जरांगे पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
त्यापूर्वी जरांगे पाटलांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेतेमंडळी आणि
पदाधिकारी येत आहेत. माझी भूमिका पहिल्यापासूनच स्पष्ट आहे. राजकारणात
मला पडायचं नसून निवडणूक लढण्याचा प्रश्नच उभा राहत नाही. आपण दिलेला
शब्द पाळतो. आपल्या समाजाला न्याय मिळावा यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न
सुरू आहेत. रात्रंदिवस मेहनत करून समाज एक संघ कसा राहील यासाठी
प्रयत्न करत आहोत. समाजाचा अपमान होईल अशा कुठल्याही पाऊल मी
उचलणार नाही. किंबहुना समाजाची गर्दी होत असली तरी व्यक्तिगत निर्णय
समाजावर लादणार नाही. असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. राजकीय समीकरण
जुळलं तर समाजाचा विजय आहे. कुठल्याही एका जातीच्या आधारावर निवडणूक
लढता येत नाही. या देशात अशा पद्धतीने कोणीही निवडणूक लढू शकत नाही
ही अक्कल ही मला आहे. असेही ते म्हणाले. राज्याच्या राजकारणात राजकीय
समीकरण जुळणे फार महत्त्वाचे आहे. कुठलाही एका जातीच्या आधारावर
निवडणूक लढवल्या जात नाही. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून आमचे समीकरण
जुळवणे सुरू आहे. येत्या 30 तारखेला त्या अनुषंगाने बैठक असून या बैठकीत
काय होतं हे बघू. तसेच राज्यातील बांधवांना ही सूचना केल्या आहेत की अंतरवाली
सराटीत 29-30 तारखेला गर्दी करू नका. पण इथे गर्दी केल्याने मला काहीही सुचत
नाही. निर्णय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ठरवलं जाईल. एकंदरीत समाजाचे वाटोळ
होईल असा निर्णय मला घ्यायचा नाही. असे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/bjps-third-list-of-25-candidates-released/