पातूर तालुका प्रतिनिधी | माझोड
राज्य महामार्ग क्रमांक २८४ वरील माझोड – बाभुळगाव रस्त्याचा कि.मी. ५२ ते ६५ दरम्यानचा भाग अत्यंत खराब
झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता.
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नागरिकांकडून सातत्याने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात होती.
ही बाब लक्षात घेऊन अकोल्याचे युवा खासदार अनुपभाऊ धोत्रे यांनी
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला.
त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, CRF (Central Road Fund) अंतर्गत ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्यामुळे नागरिकांत समाधानाची लाट पसरली आहे.
तसेच, संपूर्ण बाळापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल १९ कोटी रुपयांचा निधी CRF अंतर्गत मंजूर झाल्याबद्दल आज
परिसरातील नागरिकांच्या वतीने खा. अनुपभाऊ धोत्रे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभात भाजपाचे ज्येष्ठ नेते पुंडलिकराव आखरे, युवा उद्योजक व शेतकरी इंजि. श्रीकांत बराटे, रमाकांत भरकर,
शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ परनाटे यांनी खासदार धोत्रे यांचे अभिनंदन करत त्यांचे आभार मानले.
यावेळी भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रवीणजी देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती.
रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास लवकरच सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.