मे महिना म्हटलं की अकोल्यात तापमानाचा पारा 46-47 अंश सेल्सिअसपर्यंत जातो.
पण यंदा मात्र चित्र पूर्णपणे वेगळं आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी
पावसाने थैमान घातल्यामुळे उन्हाळ्यातच पावसाळ्याचा अनुभव अकोल्यकर घेत आहेत.
Related News
आज 26 मे रोजी सकाळपासूनच अकोला शहरासह आसपासची गावं,
शेती क्षेत्र धुक्याच्या दाट चादरीखाली दडून गेली होती.
हे दृश्य मे महिन्यासाठी अत्यंत दुर्मीळ मानलं जातं.
उन्हाच्या झळांत पावसाचं थंडावलेलं हवामान आणि त्यात धुक्याची जोड
मिळाल्याने नागरिक आश्चर्यचकित झाले आहेत.
अनेकांनी या बदललेल्या हवामानाचा आनंद घेतला असला तरी शेतीच्या दृष्टीने हे वातावरण
नेमकं किती फायदेशीर ठरेल, यावर अजून स्पष्टता नाही.
हवामान विभागाने असा अंदाज व्यक्त केला आहे की पुढील दोन ते तीन
दिवस असेच हवामान राहणार आहे.
त्यामुळे अकोल्यात मे महिना यंदा उष्णतेपेक्षा गारव्यातच सरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kovid-19-punha-vadhtoy-date-2025-middle-pahilyandach-1000-hoon-more-accessory
