अकोला: श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त महापूजा संपन्न!

आषाढी

अकोला शहरातील ३२० वर्ष पुरातन

श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त पहाटे

महापूजा संपन्न झाली.

Related News

श्री विठ्ठल मंदिर अखंड हरीनाम सप्ताह मंडळाचे सर्वसेवाधिकारी

कृष्णा शर्मा व अर्चना शर्मा यांचे हस्ते विधिवत अभिषेक पूजा संपन्न करण्यात आली.

याप्रसंगी मंडळाचे व्यवस्थापक रमेश अलकरी, प्रवीण वाणी, आनंद उगले,

यशोधन गोडबोले व इतर विश्वस्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

आषाढी निमित्त श्री विठ्ठल मंदिर येथे मागील ९१ वर्षांपासून

अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते,

आषाढी ला भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येते व पंचक्रोशीमधील भावीक दर्शनाला गर्दी करतात.

सप्ताहच्या समाप्तीनंतर श्री विठ्ठल रुख्मिणी मातेची भव्य शोभयात्रा शहरातून निघते.

Read also: https://ajinkyabharat.com/amit-shah-is-infamous-home-minister-sanjay-raut/

Related News