“माचिस नाही दिली म्हणून क्रूर हत्याकांड! दिल्लीत दोन जणांचा पाठलाग करून खून”

"माचिस नाही दिली म्हणून क्रूर हत्याकांड! दिल्लीत दोन जणांचा पाठलाग करून खून"

दिल्ली |

मॉडेल टाउन: राजधानी दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आली आहे.

माचिस न दिल्यामुळे बाबू नावाच्या तरुणाने दोन व्यक्तींना पाठलाग करत

Related News

क्रूरपणे ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली असून,

एका १७ वर्षीय साक्षीदाराच्या माहितीवरून मॉडेल टाउन पोलिसांनी डबल मर्डरचा गुन्हा नोंदवला आहे.

आरोपी बाबूचा शोध सुरू असून, पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत.

मुख्य घटना:

साक्षीदाराने सांगितल्याप्रमाणे, तो त्या रात्री गुरुद्वाऱ्यात लंगर खाल्ल्यानंतर कृपाल

बाग येथील योग आश्रमाजवळील फुटपाथवर बसला होता.

तिथेच रात्री २ वाजता बाबू आला आणि त्याने माचिस मागितली.

नकार दिल्यानंतर बाबूने फुटपाथवर बसलेल्या इतर व्यक्तींकडे माचिस मागितली.

त्यांनी नकार दिल्यानंतर वाद झाला आणि बाबूने सीमेंटच्या टाईलने एकाच्या डोक्यावर जोरात वार केला.

त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर इतर दोघे पळाले असता बाबूने त्यांचाही पाठलाग करत दुसऱ्यालाही ठार मारले.

चौकशी आणि कारवाई:

पोलिसांनी सांगितले की, एक मृतदेह योगा आश्रमाजवळ आणि दुसरा

५० मीटर अंतरावर एनपीएल ग्राऊंडजवळ सापडला.

दोघांचे वय ४५ ते ५० च्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या आरोपीचा शोध सुरू असून, मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

साक्षीदाराने बाबूची ओळख सांगितली असून, तो संगम पार्क येथे राहतो.

Read Also : https://ajinkyabharat.com/bmc-nivadnuadhi-thackeray-gatala-motha-push-sanjana-ghadi-shinde-gatat-sankat/

Related News