मुंबई |
14 एप्रिल: राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी नाराजीचं नाट्य काही थांबताना दिसत नाही.
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री
Related News
बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं भाषण अचानक रद्द करण्यात आलं.
या गोष्टीवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
कार्यक्रमाच्या मूळ वेळापत्रकात शिंदे आणि अजित पवार यांना ५-५ मिनिटांचं भाषण देण्यात येणार होतं.
मात्र कार्यक्रमाच्या आदल्या रात्री वेळापत्रकात बदल करण्यात आला आणि नवीन यादीत केवळ
राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांचा समावेश ठेवण्यात आला.
यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री मंचावर उपस्थित राहूनही बोलू शकले नाहीत.
कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट निघून गेले, तर एकनाथ शिंदे
यांनी ठाण्याला परत जाऊन पत्रकार परिषद घेत नाराजी फेटाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी भाषणाच्या
कार्यक्रमात बदल करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/machis-nahi-dili-mahanun-cruel-massacre-delhi/