लोकसभेच विशेष अधिवेशन २४ जूनपासून

लोकसभेचे विशेष अधिवेशन

लोकसभेचे विशेष अधिवेशन

२४ जून ते ३ जुलै या कालावधीत होणार असून लोकसभेच्या अध्यक्षांची निवड २६ जून रोजी होईल.

Related News

विशेष अधिवेशनात नव्या लोकसभेतील

नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल.

त्यानंतर दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपतींचे अभिभाषण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

संसदेचे हे अल्पावधीचे अधिवेशन असून नवे सदस्य लोकसभेच्या अध्यक्षांची निवड करणार आहेत.

हे विषेश अधिवेशन ८ दिवस चालणार असून

२४ आणि २५ जून रोजी नवनिर्वाचित संसद सदस्यांचा

शपथविधी देखील सभागृहात पार पडेल अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

पण भाजपचा या अधिवेशनातील प्रमुख अजेंडा हा

एनडीए सरकारच्या लोकसभा अध्यक्ष निवडीचा असेल.

२४ जून ते ३ जुलै या काळात हे अधिवेशन चालणार आहे.

लोकसभा अध्यक्षपदासाठी जी नावे चर्चेत आहेत,

त्यात आंध्र प्रदेशातील भाजपच्या नेत्या डी. पुरंदेश्वरी,

याच राज्याचे टीडीपी नेते राममोहन नायडू

आणि जी. एम. हरीश माथूर यांची नावे चर्चेत आहेत.

टीडीपीचे संस्थापक एन. टी. रामाराम यांच्या कन्या असलेल्या दुगुबती पुरंदेश्वरी

या आंध्र प्रदेश भाजपच्या अध्यक्षा आहेत.

याआधी केंद्रात राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

राममोहन नायडू यांनी अलिकडेच केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली होती.

माजी केंद्रीय मंत्री दिवंगत येरन नायडू यांचे पुत्र असलेले राममोहन नायडू

हे टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

जी. एम. हरीश माथूर हे लोकसभेचे माजी अध्यक्ष स्व. जी. एम. सी. बालयोगी यांचे पुत्र आहेत.

Read also : श्रींची पालखी शेगावहून उद्या होणार पंढरपूरला मार्गस्थ.. (ajinkyabharat.com)

Related News