ज्या कुटुंबाचंं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
ज्या कुटुंबाचंं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलै महिन्यात या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती.
Related News
Nepal Flash Flood : नेपाळच्या विनाशात मोठी दिलासादायक बातमी; त्रिशुली प्रकल्पातील ३५० मजुरांची सुटका, ६३ भारतीयांचा समावेश
Nepal : Nepal मध्ये मुसळधार प...
Continue reading
शेतीचा उत्पादन खर्च 25 ते 30 टक्क्यांनी कमी होऊ शकतो; मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांना AI आणि तंत्रज्ञानाच्या वापराचा सल्ला
शेती क्षेत्रासमोरील वाढता ...
Continue reading
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा डबल झटका! दूध आणि ऑटो-टॅक्सी प्रवास महागणार; सप्टेंबरपासून खर्च वाढण्याची शक्यता
सप्टेंबर महिना सुरू होताच मुंबईकरांच्या घ...
Continue reading
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचं मानधन १५०० वरून ३ हजार करण्याची मागणी; आमदार रवी राणांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फॉर्म्युला
मुख्यमंत्री माझी
Continue reading
Hybrid Home Loan: हायब्रिड होम लोन म्हणजे काय? EMI वाढीचा फटका टाळता येतो का? जाणून घ्या फायदे आणि तोटे
Hybrid Home Loan EMI : घर खरेदी क...
Continue reading
मराठा आंदोलकांसाठी मोठी खुशखबर; मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी जालन्यात हेल्पलाइन कक्ष सुरू, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे...
Continue reading
Nepal मध्ये माणुसकीला काळिमा! महापुरातील मृतदेहांवरील दागिन्यांची लूट; व्हिडीओ व्हायरल होताच दोघांना अटक
Nepal : नैसर्गिक आपत्तीच्या काळात माणुसकी, संव...
Continue reading
रिक्षाचालकांना वर्षभराची मुदत देण्याच्या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज? आशिष शेलारांनी स्पष्टच सांगितलं
अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकड...
Continue reading
Nepal Flash Flood: महापुराने नेपाळ बेचिराख, तरीही परदेशी बचाव पथकांना नकार; ‘मदतीची गरज नाही’ म्हणण्यामागे मोठं कारण काय?
Nepal : तिबेटमधील हिमनद्या आणि...
Continue reading
Nepal : फक्त 90 मिनिटं… नेपाळ-चीन सीमेवर महाअलर्ट! ग्लेशियर सरोवर ओव्हरफ्लो; पुन्हा जलप्रलयाचा धोका
काठमांडू : Nepal मध्ये नुकत्याच झालेल्या विनाशकारी प...
Continue reading
टॅक्सी-रिक्षा चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक...
Continue reading
पावसाळ्यात अतिसाराचा धोका वाढतोय; ‘या’ प्रतिबंधात्मक टिप्स फॉलो करा, जाणून घ्या कोणती लक्षणे गंभीर
पावसाळा सुरू होताच देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार ...
Continue reading
आतापर्यंत एकूण नऊ हाफ्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं बोललं जात आहे.
तसेच सरकार इतर योजनेचे पैसे या योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे.
मात्र दुसरीकडे काहीही झालं तरी ही योजना सुरूच राहील असा दावा महायुतीच्या सरकारकडून केला जात आहे.
दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 हजार रुपये नाही तर 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता.
मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेतील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
याबाबत बोलताना सर्व सोंगं करता येतात परंतु पैशांचं सोंग करता येत नाही.
राज्याची आर्थिक स्थिती सुधारली की योग्यवेळी निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.
लाडक्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली, त्यामुळे राज्याची आर्थिक ताकद वाढली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 देणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
विरोधकांनी सुधरावं, आम्ही जे बोललो ते बोललो, काँग्रेसने देखील आश्वासन दिली होती, मात्र त्यांनी ती पाळली नाहीत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मात्र तरी देखील 2100 रुपये कधी मिळणार? याकडे आता राज्यातील लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे.