पुणे : बारामतीचा विकास नेमका केला कोणी हे सांगताना पवार कुटुंबात वाकयुद्ध रंगलं आहे. संस्था कोणी काढल्या, कंपन्या कोणी आणल्या ते सांगण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूनं अगदी जोरकसपणे सुरू आहे. शरद पवारांच्या बाजूनं त्यांचे नातू रोहित पवार खिंड लढवत आहेत. तर अजित पवार पुतण्या रोहितला उत्तर देत शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका करत आहेत. रोहित पवारांचं शिक्षण कुठे झालं, याचा मुद्दा अजित पवारांनी रविवारी एका भाषणात उपस्थित केला. आता त्यावरुन काका, पुतण्यात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे बारामतीतलं वातावरण तापलं आहे.
अजित पवारांनी रोहित यांच्या शिक्षणाचा विषय रविवारच्या भाषणात काढला. ‘काहीजण वालचंदनगरला शिकत होते, कारण सरळ आहे. त्यावेळी फक्त वालचंदनगरलाच चांगलं शिक्षण मिळत होतं बारामतीत मिळत नव्हतं,’ असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना उत्तर दिलं. शरद पवारांनी विद्या प्रतिष्ठान काढली हा मुद्दा अजित पवारांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
काका अजित पवारांच्या टिकेला आता रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे. ‘मी किती शिकलोय, काय शिकलोय, याच्याशी काय घेणं देणं आहे? मी बारामती, वालचंदनगर, मुंबई या ठिकाणी शिकलो. मी ग्रॅज्युएट आहे. मला डबल ग्रॅज्युएट व्हायचं होतं. मात्र मला होता आलं नाही. कारण माझ्या वडिलांच्या व्यवसायात अडचणी आल्या होत्या. वडील अडचणीत असताना वडिलांबरोबर राहणं, ही आपली परंपरा आहे,’ असं म्हणत रोहित यांनी काकांना प्रत्युत्तर दिलं.
Related News
‘मला चटके देताना एवढंच म्हणायचे…’, गरम सळईचे चटके दिलेल्या तरूणानं सांगितली धक्कादायक आपबीती
मुलीच्या छेडछाडीप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक आरोपी, सध्या शिंदे गटात!”
शिंदे सरकारच्या योजनेनं गोची; ‘लाडक्या भावां’मुळे भलतीच अडचण; कॅबिनेटमध्ये वादळी चर्चा
Ajit Pawar : ‘पुण्यात भगवा फडकवायचाय’, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिलं असं उत्तर
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीची तिरडी; पुण्यात रणरागिणींचं अनोखं आंदोलन!
मोठी बातमी! मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक; CSMT वरुन सुटणाऱ्या ५९ लोकल, ‘या’ मेल-एक्स्प्रेस रद्द, पाहा वेळापत्रक
गणपत गायकवाड यांच्या मुलाचं नाव चार्जशीटमधून वगळलं, ठोस पुरावे नाहीत, पोलिसांचं स्पष्टीकरण
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान, म्हणाले, आमच्या सरकारने ज्या बाबी…
बुडत्याचा पाय खोलात! शेअर मार्केटमध्ये काही तरी मोठं घडणार; Nifty कोसळण्याच्या उंबरठ्यावर
मुंबई तापली, पाणीसाठा कमी! महापालिकेचं मुंबईकरांना महत्त्वाचं आवाहन
फडणवीसांमुळे घड्याळ आणि धनुष्यबाणाला मतं? सुरेश धसांच्या दाव्याने महायुतीत मतभेद!
“रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी: रेशनसोबत मिळणार खास गिफ्ट!”
परदेशी जाऊन शिकण्याची माझी इच्छा होती. माझे दोन भाऊ जय आणि पार्थ हे भारताच्या बाहेर शिकले, याचा मला आनंद आहे. कितीही शिकलं, पण आपल्याला आपले विचारच जगता आले नाही तर काय उपयोग? असा सवाल करत रोहित पवारांनी काकांना टोला लगावला. मी आजी, आजोबांचा, वडिलांचा विचार जपत असल्याचं म्हणत त्यांनी अजित पवारांना सुनावलं.बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ या ठिकाणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.