कोलकाता : केकेआरच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचे सोमवारच्या सामन्यात पानीपत केल्याचे पाहायला मिळाले.
केकेआरने दिल्लीच्या फलंदाजीला वेसण घालत त्यांना १५३ धावांवर रोखले.
त्यानंतर फिल सॉल्टच्या धडाकेबाज सलामीच्या जोरावर सहजपणे हा सामना जिंकला. या विजयासह केकेआरच्या संघाने दोन गुण आपल्या पदरात पाडून घेतले आहेत.
Related News
पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल यांचा साखरपुडा मोडला; 6 महिन्यांतच नात्याला पूर्णविराम, आकृतीची भावुक पोस्ट
मार्चमध्ये मोठ्या थाटात झाला होता साखरपुडा; आता आकृतीने सोशल मीडियावर दिली नातं...
Continue reading
Sugar Stock Limit: देशभरात साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध; कोलकात्याला मात्र विशेष सूट, सरकारने का घेतला हा निर्णय?
सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी, कृत्रिम टंचाई आणि सट्टेबाजीला...
Continue reading
IND vs SL: पंतला अतिशहाणपणा नडला, ताबडतोब मैदान सोडावं लागलं; मॅचच्या पहिल्याच दिवशी काय घडलं?
Rishabh Pant Injury: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील द...
Continue reading
IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहचं कमबॅक, जडेजाही परतला, नव्या चेहऱ्याला संधी
श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी...
Continue reading
मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) तृणमूल काँग्रेसची सुमारे 440.42 कोटी रुपये असलेली तीन बँक खाती गोठवली. केअरवेल एव्हिएशन व्यवहार, खासगी विमान आणि हेलिकॉप्टर खरेदीस...
Continue reading
सोशल मीडियावर श्रेयस अय्यर, गौतम गंभीर ट्रोल : भारताचा इतिहासातील सर्वात लाजिरवाणा पराभव, इंग्लंडकडून १२५ धावांनी दारुण पराभव
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय क्रि...
Continue reading
आकृती अग्रवालने पृथ्वी शॉसोबतच्या साखरपुड्याच्या अफवांवर अखेर मौन सोडले. इन्स्टाग्राम पोस्ट नेमकी कोणासाठी होती, साखरपुडा मोडला का, काय आहे संपूर्ण सत्य? जाणून घ्या सर्व मोठे खुलास...
Continue reading
फुटबॉल सामना जिंकल्यानंतर झालेल्या वादाचा तीन दिवसांनी रक्तरंजित शेवट झाला. पश्चिम बंगालमधील बारुईपूर येथे प्रोसेनजीत बिस्वास या तरुणाची चाकूने हत्या करण्यात आली. तीन आरोपी ताब्यात...
Continue reading
TMC Crisis : ममता बॅनर्जींना 5 मोठे धक्के! प्रदेशाध्यक्ष चंद्रिमा भट्टाचार्यांचा धक्कादायक राजीनामा, तृणमूलमध्ये वाढले बंड
पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेससमोरील संघटनात...
Continue reading
पृथ्वी शॉ-आकृती अग्रवालचे नाते तुटले? 'विश्वासघात' पोस्ट, फोटो डिलीट आणि अनफॉलोनंतर चर्चांना उधाण
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तसेच अभिनेत्री आकृती अग्...
Continue reading
आनंद महिंद्रा मदतीसाठी सरसावले; फुटपाथवरील एका क्षणाने जिंकली लाखो मनं
सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात, काही आश्चर्यचकित करतात, तर ...
Continue reading
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान याच्यासोबत कोलकात्यात एक धक्कादायक घटना घडली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमातून बाहेर पडत असत...
Continue reading
केकेआरने यावेळी सात विकेट्स राखत दिल्लीवर दमदार विजय साकारला.
दिल्लीच्या १५४ धावांचा पाठलाग करताना केकेआरने पहिल्याच षटकात २३ धावांची लूट केली आणि आपले इरादे स्पष्ट केले.
केकेआरने पहिल्या ६ षटकांच्या पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता ७९ धावांची भर घातली होती.
त्यावेळी केकेआरचा संघ हा सामना १० विकेट्स राखून जिंकणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती.
पण सुनील नरिनच्या रुपात केकेआरला पहिला धक्का बसला. नरिनने यावेळी १५ धावा केल्या.
पण त्यावेळी फिल सॉल्ट तुफानी फटकेबाजी करत दिल्लीच्या गोलंदाजीची पिसे काढत होता.
सॉल्टने यावेळी २६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले, यामध्ये पाच चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.
केकेआरने ८.६ षटकांत आपले शतक पूर्ण केले आणि विजयाच्या दिशेने ठोस पाऊल टाकले.
पण शतकाला चार धावा बाकी असताना सॉल्ट बाद झाला आणि केकेआरला दुसरा धक्का बसला. सॉल्ट यावेळी आपले काम चोख निभावून परतला होता
सॉल्टने यावेळी फक्त ३३ चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ६८ धावांची खणखणीत खेळी साकारली.
सॉल्ट बाद झाल्यावर चार धावांच्या फरकाने रिंकू सिंगही बाद झाला, रिंकूला यावेळी ११ धावा करता आल्या.
पण त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी संयतपणे फलंदाजी करत संघाला विजयासमीप नेले.
तत्पूर्वी, केकेआरच्या गोलंदाजांनी दुसऱ्या षटकापासूनच दिल्लीच्या धावसंख्येला लगाम लावण्याचे काम चोख बजावले.
केकेआरने पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शाय होप आणि स्ट्रीटियन स्टब्ससारख्या फलंदाजांना स्वस्तात बाद केले. दिल्लीचा संघ यावेळी शतक गाठणार की नाही, असे वाटत होते.
पण यावेळी संघाच्या मदतीला धावून आला तो कुलदीप यादव. कुलदीपने अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
कुलदीपने यावेळी २६ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ३५ धावांची दिल्लीसाठी सर्वाधिक खेळी साकारली.
कुलदीपने यावेळी अखेरपर्यंत केकेआरच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला. त्यामुळेच दिल्लीच्या संघाला २० षटकांत १५३ अशी धावसंख्या तरी उभारता आली.
Also Read: https://ajinkyabharat.com/possibility-of-disruption-of-banking-services-to-bank-employees/