Wasim Akram : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सुमार कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट टीमवर चहूबाजूंनी टीका सुरु आहे.
माजी क्रिकेटपटू वसिम अक्रम इतके भडकलेत की, त्यांनी टीमवर वांशिक टिप्पणी केली. अक्रम काय बोलून गेले ते जाणून घ्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमान असल्यामुळे पाकिस्तानी टीम दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा होती.
Related News
अकोला (गंगानगर बायपास):
गत १० वर्षांपासून भक्तीमय उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या सालासर बालाजी मंदिरात
यंदा हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक १२ एप्रिल...
Continue reading
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
अकोला औद्योगिक वसाहतीतील ए.डी.एम. ऍग्रो कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या
न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाम भूमिका घेत ...
Continue reading
पण ही अपेक्षा फोल ठरली आहे. टुर्नामेंटला सुरुवात झाल्यानंतर आठवड्याभराच्या आतच पाकिस्तानच्या क्रिकेट
टीमला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
पाकिस्तान टीमच्या या खराब प्रदर्शनानंतर त्या देशातील क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड राग आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने तर आपल्याच टीमबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट टीमवर त्याने वांशिक टिप्पणी केली. एका शो मध्ये वसिम
अक्रमने पाकिस्तानी खेळाडूंची तुलना माकडाबरोबर केली. वसिम अक्रमसारखा खेळाडू ऑनएअर हे जे शब्द बोलला,
त्यातून पाकिस्तान टीमबद्दल किती राग भरला आहे, ते दिसून येतं.
पाकिस्तान टीमचा ग्रुप स्टेजमधील आता एक सामना बाकी आहे. 27 फेब्रुवारीला पाकिस्तान
आणि बांग्लादेशध्ये सामना होणार आहे. ही मॅच फक्त औपचारिकता मात्र आहे.
कारण दोन्ही टीम्स स्पर्धेतून आधीच बाहेर गेल्या आहेत. वसिम अक्रम पाकिस्तानी खेळाडूंवर
वांशिक टिप्पणी करताना बरच काही बोलला. भारत-पाकिस्तान सामन्यातील
एका प्रसंगाच उदहारण देताना पाकिस्तानी खेळाडूंची त्याने माकडाबरोबर तुलना केली.
‘….तर तिथेच माझी शाळा घेतली असती’
वसिम अक्रम बोलला की, “पहिला की दुसरा ड्रिंक्स ब्रेक होता. त्यावेळी केळ्यांनी भरलेली एक मोठी परात मैदानावर आली.
इतकी केळी तर माकडं सुद्धा खात नाहीत, जितके हे खातायत” वसिम अक्रमसोबत या कार्यक्रमात
वकास युनूसशिवाय दोन भारतीय क्रिकेटर्स अजय जडेजा आणि निखिल चोप्रा सुद्धा उपस्थित होते.
अक्रम बोलला की, “मी जेव्हा खेळायचो तेव्हा इतकी केळी खाताना मला इम्रान
खान यांनी पाहिलं असतं, तर तिथेच माझी शाळा घेतली असती”
ग्रुप स्टेजमधूनच OUT
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच खराब प्रदर्शन आणि भारताकडून झालेला पराभव हे वसिम अक्रम
भडकण्यामागच मुख्य कारण आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप स्टेजमधूनच पाकिस्तानची टीम बाहेर गेली आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/lagnachaya-37-varshanantar-govinda-ghenar-ghat-khotaan-ghanoon-ghaya-kya-ai/