येत्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात पावसाचा इशारा

राज्यातील

विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार

राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे.

तर काही भागांत अद्यापही पावसाची शक्यता कायम आहे.

Related News

त्यातच मुंबईसाठी पुढील २४ तास अत्यंत महत्वाचे असल्याचे

हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

येत्या २४ तासांत कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील

काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात

मुंबईच्या हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

तर विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, पावसाची उघडीप असलेल्या भागात ढगाळ हवामानासह

उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे.

पावसाअभावी विदर्भात कमाल तापमान चाळिशीपार गेले आहे.

मात्र आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांची अडखळलेली वाटचाल सुरू होण्यास

पोषक हवामान होत आहे.

त्यामुळेच राज्यात पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

पावसासह जोरदार वारे वाहणार आज हवामान खात्याने पालघर,

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारामध्ये

मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

तर बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा,

नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये वादळी वारे,

विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/34-people-died-after-drinking-poisonous-liquor-in-tamil-nadu/

Related News