भारतीय सेनेला विराट कोहलीचा सलाम

भारतीय सेनेला विराट कोहलीचा सलाम

नवी दिल्ली, ८ मे – भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात युद्धजन्य

स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी संपूर्ण देशभरातून भारतीय सेनेबद्दल कृतज्ञता आणि अभिमान व्यक्त केला जात आहे.

स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीनेही भारतीय सेनेला भावनिक श्रद्धांजली अर्पण करत सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

Related News

विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले – “या कठीण काळात आपल्या देशाच्या रक्षणासाठी

सज्ज असलेल्या आमच्या सशस्त्र दलांसोबत आम्ही ऐक्याने उभे आहोत आणि त्यांना सलाम करतो.”

पुढे लिहिताना कोहली म्हणतो – “त्यांच्या अटूट शौर्यासाठी आम्ही नेहमीच ऋणी राहू

आणि त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या बलिदानांसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.”

याआधी नुकतेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्मानेही भारतीय सेनेप्रती आपली भावना व्यक्त करत

एक प्रेरणादायी संदेश दिला होता. देशात युद्धजन्य तणाव निर्माण झाल्यामुळे IPL 2025 हंगाम सध्या स्थगित करण्यात आला आहे.

भारतीय सेनेचे शौर्य, त्याग आणि निस्वार्थ सेवा याबाबत देशभरातून मान्यवरांकडून सलाम व्यक्त होत आहे.

विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंचे हे शब्द भारतीय जवानांच्या मनोबलात निश्चितच भर घालणारे ठरतात.

Read Also : https://ajinkyabharat.com/siren-kadhi-vajto-hawai-hallya-hallyachaya-dhokyavi-sasiyan-mito-kiti-vachhanyasathi/

Related News