देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत असून, आज (२१ मे) दुपारी १
वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतात एकूण २५७ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
मुंबई, चेन्नई आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
Related News
“भारताच्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत”
“भारताविरुद्ध कट रचणाऱ्या अल्पवयीनाची गुजरातमधून अटक;
“मला 2 कोटी मागितले अन् वैष्णवीचा जीव गेला!”
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ!
पाकिस्तानसाठी काम करत होते, ज्योती मल्होत्राची मोठी कबुली;
कोकणात मुसळधार पावसाचा कहर!
केदारनाथ ते देहरादूनपर्यंत पावसाचा इशारा!
मान्सूनची चाहूल! राज्यात प्री-मान्सूनची जोरदार हजेरी,
PM Kisan 20वा हप्ता मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी 30 मे पूर्वी पूर्ण करा ‘हे’ महत्त्वाचे काम
पावसामुळे मुंबई इंडियन्सचे स्वप्न भंगणार?
उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावर शिवसेनेचे तीव्र आंदोलन;
गौसेवेचा संकल्प घेत विद्यार्थ्यांनी अनुभवले गोमातेचे महत्त्व
विशेष म्हणजे, एकट्या मुंबईत ५६ रुग्ण आढळल्याने स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत.
कोरोना संसर्गावर पुन्हा अलर्ट
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गाची वाढ पाहता, भारतातही केंद्र सरकारने कोरोना अलर्ट जारी केला आहे.
आरोग्य मंत्रालयाने राज्यांना RT-PCR टेस्टिंग वाढवण्याचे, हॉस्पिटल्समध्ये तयारी
ठेवण्याचे आणि लसीकरणाचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासन सज्ज, खबरदारीचे उपाय सुरू
आरोग्य यंत्रणांनी खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला असून,
नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
➡️ मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढत असल्यानं प्रशासन सतर्क
➡️ देशभरात प्रतिबंधात्मक उपाय सुरू, टेस्टिंग वाढवण्याचे आदेश
➡️ सामान्य नागरिकांनी गर्दी टाळावी, मास्क वापरावा आणि आरोग्य तपासणीसाठी पुढे यावं
कोरोनाचा संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला असून,
नागरिकांनीही जबाबदारीने वागणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/sonyachaya-darat-punha-vadha/