एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा केली
आहे. इम्तियाज जलील नांदेडमधून लोकसभा पोट निवडणूक
लढवणार आहेत. तर विधानसभा निवडणूक छत्रपती
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
संभाजीनगरमधून लढणार आहेत. इम्तियाज जलील म्हणाले,
नांदेडमधून लोकसभा लढण्याची संधी आलेली आहे. लोकांमध्ये
रोष पाहायला मिळतोय. मी महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम
खासदार होतो. त्याला पाडण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी कशी
मेहनत घेतली होती, हे सर्वांना माहिती आहे. आमचे कार्यकर्ते
आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांची निवडणूक लढवण्याची
इच्छा आहे. एमआयएम हा पक्ष महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात
जास्त प्रतिसाद आम्हाला नांदेडमध्ये मिळाला होता. आमच्यावर
काही आरोप झाले तरी आम्ही घाबरत नाहीत. बी टीम आम्हाला
म्हणतात, आम्ही हे आरोप गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहोत.
आता आम्ही या आरोपांना काडीचंही महत्त्व देत नाहीत. आम्हाला
संधी आल्यानंतर आम्ही दिवंगत खासदाराबाबत का विचार करु?
आम्ही आमच्या पक्षाबाबत विचार करणार आहोत. आम्ही कसं
निवडून येऊ शकतो, हा विचार करणार आहोत.
काँग्रेस नेते वसंतराव चव्हाण यांनी भाजप उमेदवार प्रतापराव
चिखलीकर यांचा पराभव करत नांदेड लोकसभेतून दिमाखदार
विजय मिळवला होता. अशोक चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते
भाजपसोबत असल्यामुळे नांदेडमध्ये झालेल्या भाजपचा पराभव
महाराष्ट्रभर चर्चेला गेला. दरम्यान, मोठा विजय मिळवल्यानंतर
खासदार वसंत चव्हाण यांचे तीन महिन्यानंतर निधन झाले. त्यामुळे
नांदेडमध्ये पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र
विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच नांदेडच्या लोकसभा
निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.