राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं
फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. अज्ञात
हॅकर्सने आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक केलं आहे.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
तसेच त्या हॅकर्सकडून आदिती तटकरे यांच्या फेसबुक
अकाउंटवरुन काही आक्षेपार्ह पोस्टही करण्यात आल्या आहेत.
याबाबतची माहिती स्वत: आदिती तटकरे यांनी ट्विट करत दिली
आहे. आदिती तटकरे यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत
पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. आता पोलिसांना हॅकर्सचा
शोध घेण्यात यश येतं का? तसेच पोलीस संबंधित आरोपींवर
काय कारवाई करतात? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
“नमस्कार, माझं फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून
हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर
पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ
नये, ही नम्र विनंती. याबाबत मी पोलिसांत रितसर तक्रार दाखल
केली असून लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक
कारवाई करण्यात येईल. तसदीबद्दल क्षमस्व”, असं आदिती
तटकरे यांनी म्हटलं आहे.