शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात; एक मृत्यू, पाच जखमी
तेल्हारा: तेल्हारा शहरात पंचगव्हाण फाट्या समोर अंदाजे 100–150 मीटर अंतरावर एका गाडीने पलटी घेतली, ज्यामुळे एका पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला आणि पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात मृत्यू झालेला कार्यकर्ता अक्षय कैलास म्हसाळ असून, जखमींमध्ये अनिकेत ढवळे (शिवसेना शिंदे गट तेल्हारा शहर प्रमुख), निखिल हिवराळे (शहर उपाध्यक्ष), अंकुश खंडारे, राजेश गावत्रे आणि शिवराम गिरी यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर अकोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनाक्रमानुसार, एर्टिगा गाडीने (MH-15-FT-0179) परतत असताना, रात्री सुमारे 10.30 वाजता गाडीवरील नियंत्रण अचानक सुटल्यामुळे पलटी झाली. अपघात इतका भयानक होता की गाडी एका शेतात पडली आणि मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास ठाणेदार तुनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
read also : https://ajinkyabharat.com/viman-hotel-innovative-tourism-experience-in-ujjain-%e2%82%b9-40-lakhs/
