घरगुती वादातून थरारक हत्या; पत्नीवर खलाने केला हल्ला
राज्याला हादरविणारी धक्कादायक घटना अमरावती शहरातील राजापेठ ठाण्याच्या हद्दीत घडली. गणपतीनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी एका विवाहित महिलेचा घरात रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांकडून मारेकऱ्याचा कसून शोध सुरू होता. अखेर मंगळवारी (२ डिसेंबर) गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा उलगडा करत मृत महिलेचा पती नितीन सुरेशराव इंगोले (३२, रा. अशोक कॉलनी, अर्जुनगर, अमरावती) याला अटक केली.
मृत महिलेचे नाव पिंकी इंगोले असून तिच्यासोबत नितीनचे अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. विवाहानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. घरगुती वाद, संशय आणि सततचे भांडण यामुळे नितीन प्रचंड मानसिक तणावात असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे. याच रागातून आणि कंटाळ्यातून आपण खून केल्याची कबुली आरोपी पतीने दिली आहे.
रविवारी (३० नोव्हेंबर) पहाटे पिंकी झोपेत असताना नितीनने घरातील खल उचलून तिच्या डोक्यावर वार केले. त्यानंतर तिला भिंतीवर व पिल्लरवर आपटल्याने ती गंभीर जखमी झाली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर नितीनने प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला; मात्र संशयास्पद हालचाली आणि प्राथमिक तपासातून पोलिसांना पुरावे मिळाले. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
Related News
कृष्ण बनून सजला, पण गळ्यातील माळच ठरली जीवघेणी; एकुलत्या एक आर्यनचा दुर्दैवी मृत्यू
जन्माष्टमीचा आनंद शोकात बदलला; माळेतील मणी गिळल्याने सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मुलांना सजव...
Continue reading
पतीकडून संशय अन् सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुस्तीपटू अश्विनी पौळ प्रकरणातील FIR मधून धक्कादायक खुलासे
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग ...
Continue reading
मुलाच्या तोंडात चॉकलेट असतानाच कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी घेतला धक्कादायक निर्णय; नळदुर्ग किल्ला प्रकरणात नवे खुलासे
नळदुर्ग : राष्ट्रीय दर्जाची कुस्...
Continue reading
अखेर त्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; अपघातानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक, चाळीसगावात घडलं काय?
चाळीसगाव : चाळीसगाव-मालेगाव रोडवरील बिलाखेड ...
Continue reading
पुराच्या पाण्यात वाहून आली बँकेची तिजोरी; 29 जणांनी फोडून लुटले कोट्यवधींचे पैसे, पोलिसांची मोठी कारवाई
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे ज...
Continue reading
समृद्धी महामार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ; टायर फोडून लुटमार, दगडफेक अन् हवेत गोळीबार, तब्बल १८ लाखांचा ऐवज लंपास
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ...
Continue reading
दहाव्या मजल्यावरून उडी मारली, पण झाडामुळे वाचला जीव; भांडूपमधील नवविवाहितेच्या घटनेने खळबळ
मुंबईतून एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आह...
Continue reading
Parel Laxmi Cottage : परेलमध्ये रात्री दोन गटांमध्ये तुफान राडा; अनेक जण जखमी, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
मुंबईतील परेल परिसरात बुधवारी रात्री दोन गटांमध...
Continue reading
अंकित बलियान हत्या: ‘मर्डर मार दे सडक के ऊपर..’ इन्स्टावर गाणं टाकल्यानंतर दोन तासांत हत्या; 2 दिवसांपासून सुरू होती प्लॅनिंग
उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यु...
Continue reading
पाय बांधले, डोक्यावर वार; NEET विद्यार्थिनीच्या हत्येने वाराणसी हादरलं, पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ
वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये NEET परी...
Continue reading
क्रिकेट विश्वात खळबळ! नाईट क्लबबाहेर स्टार क्रिकेटरला अटक, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
लंडन : क्रिकेट विश्वातून सध्या एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ...
Continue reading
Khavdya Dongar Case : संभाजीनगरातील खवड्या डोंगराचं रहस्य काय? ‘खवड्या’ असं नाव का पडलं? वाचून धक्काच बसेल!
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभा...
Continue reading
नितीन इंगोले हा राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या कार्यालयात ‘प्रयोगशाळा सहायक’ पदावर कार्यरत आहे. सरकारी कर्मचारी असूनही त्याने केलेल्या निर्घृण कृत्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात हत्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून घटनेतील नेमके कारण व इतर बाबींचा शोध पोलिस घेत आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/malegaon-taluk-of-nashik-district-asaleya-dongarale/