ज्ञानप्रकाश विद्यालय काजळेश्वरच्या १० वी बॅचचा स्नेह मिलन कार्यक्रम संपन्न

ज्ञानप्रकाश

काजळेश्वर, दि. ६ नोव्हेंबर: ज्ञानप्रकाश विद्यालय काजळेश्वरच्या १९९५-९६ च्या दहावीच्या बॅचचा स्नेह मिलन कार्यक्रम हभप. शरद महाराज गोरले यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्णपणे संपन्न झाला. या कार्यक्रमाद्वारे वर्गमित्रांनी एकमेकांना भेटून सुख-दुःखाची देवाण-घेवाण केली आणि मैत्रीच्या नात्याला अधिक घट्ट बनवले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मुख्याधापक एस. पी. उपाध्ये, तर प्रमुख उपस्थितीत राज्य शासन पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य अशोकराव उपाध्ये, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक हभप. शरद महाराज गोरले, तसेच श्रीमती सुनंदा गाढवे, विद्यालयाचे शिक्षक राजेश खडसे, गजानन काळोदे, शंकर चव्हान, सुभाष पवार, मनोज उपाध्ये, योगेश उपाध्ये यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

हभप. शरद महाराज गोरले यांनी गुरु-शिष्य, मैत्रीचे नाते आणि शाळेतील आठवणींवर प्रकाश टाकत भावपूर्ण भाषण केले. तीन दशकानंतर एकमेकांना भेटताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा स्पष्ट दिसत होती. नोकरी, व्यवसाय आणि शेतीसारख्या व्यस्त जीवनातही वर्गमित्रांची मोठी उपस्थिती गप्पा आणि आठवणींमध्ये रंग भरत होती.

Related News

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे प्रतीमेचे पूजन, हारार्पण आणि दीप प्रज्वलन यांद्वारे झाली. यावेळी एस. पी. उपाध्ये आणि ऐ. टी. उपाध्ये सरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन मनोज उपाध्ये यांनी केले तर आभार मनीष अग्रवाल यांनी मानले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

हभप. शरद महाराज गोरले यांनी अभिप्रेत व्यक्त करत, असे स्नेह मिलनाचे कार्यक्रम दरवर्षी होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

read also : https://ajinkyabharat.com/5-types-of-funny-memes-viral-due-to-larissa-bonesi-and-rahul-gandhis-comment/

Related News