अकोला. गळंकी रोड गुलजारपूर वस्तीत अमरधाम स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आली
असून ही स्मशानभूमी सद्यस्थितीत शेवटच्या घटका मोजत असल्याचा दिसत आहे.
अकोला शहरातील डाबकी रोड परिसर भीम नगर चौक जय हिंद चौक इत्यादी
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
परिसरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून या सर्व लोकसंख्येला ही जवळ पडणारी
एकमेव स्मशानभूमी असून या स्मशानभूमीत अस्वच्छतेने कळस गाठला आहे.
ज्या टिन शेडमध्ये मृत आत्म्यास प्रेता अग्नी दिला जातो त्या टीन शेड ची अवस्था सुद्धा मोडकडीस आली
असून हे सेड कधी सुद्धा धोकादायक ठरू शकतात. स्मशानभूमीच्या परिसरात सगळी अस्वच्छता असून
या ठिकाणी क्रिया कर्म करता येणाऱ्या नागरिकांना येथील अस्वच्छता व घाणीचा सामना करावा लागतो.
या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने दररोजच्या दररोज कुठली ही साफसफाई होताना दिसत
नसून या स्मशानभूमीकडे महानगरपालिकेने लवकरात लवकर लक्ष देऊन साफसफाई तसेच
टिनसेड चे नूतनीकरण करावे अशी मागणी आरंभ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष देवा गावंडे
यांनी एका निवेदनाद्वारे महानगरपालिकेला केली आहे.
हे काम येत्या आठ दिवसाच्या आत न झाल्यास संस्थेच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्त यांची प्रतिकात्मक
प्रेत यात्रा काढून निषेध करण्यात येईल असे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
देवा गावंडे,दिपक कारळे, पंकज बाजोड, बाळा कांबळे, तुषार ढवळे, शुभम वासनकर, कुणाल जोगदंड
Read Also : https://ajinkyabharat.com/india/