मुर्तीजापुर तालुक्यातील हिवरा (कोरडे) येथे महिको कंपनीतर्फे दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य शेतकरी मेळावा आणि पीक पाहणी कार्यक्रम उत्साहात पार पडला. श्री अरुण पाटील प्रल्हादराव कोरडे यांच्या शेतावर आयोजित या कार्यक्रमाला अमरावती व अकोला जिल्ह्यातील खारपान पट्ट्यातील 1,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभागी होत मेळावा गाजवला.
कापूस वाणांची प्रत्यक्ष पाहणी
महिको कंपनीचे नामांकित ‘बाऊन्सर’ व ‘MRC 7351 गोल्ड’ कापूस वाण प्रत्यक्ष शेतात पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. दर्जेदार उत्पादन क्षमता, प्रतिकूल परिस्थितीत टिकाव आणि भावी फायदे याबाबत तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
मान्यवरांची उपस्थिती
मेळाव्यात खालील मान्यवरांनी हजेरी लावून कार्यक्रमाचे महत्व वाढवले—
Related News
श्री. निलेश राठोड – जिल्हा कृषी अधिकारी, अमरावती
श्री. लक्ष्मण नवलकर – कृषी अधिकारी, पंचायत समिती भातकुली
वैभव कोरडे – सरपंच, हिवरा कोरडे
नजीम खान – झोनल मार्केटिंग मॅनेजर, महिको कंपनी
अमरावती व अकोला जिल्ह्यातील महिकोचे अधिकृत वितरक
सर्व मान्यवरांचे स्वागत महिकोचे रिजनल बिझनेस मॅनेजर श्री. सचिन पडोळे यांनी केले.
नियोजन आणि सहकार्य
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रोशन अंबुलकर (महिको अमरावती जिल्हा प्रतिनिधी) यांनी केले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी—
ऋषिकेशभाऊ कोरडे
सुरजभाऊ कोरडे
राहुल काशिकर (महिको प्रतिनिधी, दर्यापूर)
तसेच अकोला, अमरावती, वर्धा व वरुड येथील सर्व महिको प्रतिनिधींनी मोलाचे योगदान दिले.
शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद
शेतकऱ्यांनी महिकोच्या अत्याधुनिक कापूस वाणांबद्दल उत्सुकता व्यक्त केली. हिरवेगार, जोमदार आणि अधिक उत्पादनक्षम रोपे पाहून त्यांनी महिको वाणांवर विश्वास दर्शवला.कार्यक्रमाच्या शेवटी महिको कंपनीने पुढील काळातही शेतकरी हिताचे शाश्वत उपाय आणि उपयुक्त उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.
read also : https://ajinkyabharat.com/amravati-district-tet-exam-scheduled-814-candidates-absent/
