2026:संत Gadge बाबांच्या दशसूत्री विचारांचा जागर

Gadge

सत्यपाल महाराजांची खंजेंरीचा आवाज 18 जानेवारीला निनादनार

विदर्भाच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात अनन्यसाधारण स्थान असलेल्या राष्ट्रसंत Gadge बाबा यांच्या आद्य कर्मभूमीत ‘Gadge बाबा कर्मभूमी महोत्सव’ यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पौष महिन्यातील शेवटचा रविवार म्हणजेच दि. 18 जानेवारी 2026 रोजी हा महोत्सव ऋणमोचन येथे आयोजित करण्यात आला असून, या निमित्ताने संत Gadge बाबांच्या दशसूत्री विचारांचा व्यापक जागर केला जाणार आहे.

या महोत्सवाचे आयोजन श्री. संत Gadge बाबा कर्मभूमी स्मारक समिती, क्षेत्र ऋणमोचन, जिल्हा अमरावती यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य अंदाजपत्रक समिती प्रमुख आमदार रविभाऊ राणा, माजी खासदार नवनीतताई राणा आणि सामाजिक कार्यकर्ते सुनीलभाऊ राणा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

संत Gadge बाबा : समाजसुधारणेचा दीपस्तंभ

थोर समाजसुधारक, निष्काम कर्मयोगी आणि स्वच्छतेचा मंत्र जगाला देणारे संत Gadge बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे, सातपुड्याच्या पायथ्याशी झाला. घरदाराचा त्याग करून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या उन्नतीसाठी अर्पण केले.

Related News

देव दगडात नसून, तो रोगी, निराधार, गरीब आणि उपेक्षितांच्या सेवेत आहे, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला. हातातील खराटा हा केवळ स्वच्छतेचे साधन नसून, समाजातील अंधश्रद्धा, रूढी आणि अनिष्ट परंपरांवर प्रहार करणारे प्रतीक बनले.

गावोगावी स्वच्छता करत, कीर्तन, भारूड आणि प्रबोधनातून त्यांनी लोकांशी संवाद साधला. दारू, मटण, व्यसनांपासून दूर राहण्याचा उपदेश करत त्यांनी समाजाला सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला.

आमला येथील यात्रेची ऐतिहासिक परंपरा

संत Gadge गेबाबांनी अमरावती जिल्ह्यातील आमला येथे पूर्णा नदीवर घाट बांधला. या ठिकाणी महादेवाचे मंदिर असून, पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी येथे भव्य यात्रा भरवण्याची परंपरा त्यांनी सुरू केली.

या यात्रेचा उद्देश रोगी, अंध, अपंग आणि गरजू लोकांसाठी अन्न, औषध, निवारा आणि सेवा उपलब्ध करून देणे हाच होता. मुंबई, पुणे, अकोला, अमरावतीसह विविध भागांतील दानशूर व्यक्तींना त्यांनी सेवेसाठी आवाहन केले. कपडे, घोंगड्या, भांडी, अन्नधान्य वाटपाची परंपरा त्यांनी घालून दिली, जी आजही कायम आहे.

आजही दक्षिण तीरावरील मठ-मंदिर परिसरात शासनाच्या विविध योजनांतून सामाजिक सभागृह, निवास व्यवस्था आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही यात्रा विदर्भातील एक मोठी आणि ऐतिहासिक यात्रा म्हणून ओळखली जाते.

सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांचा प्रबोधनपर कार्यक्रम

या कर्मभूमी महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्रभूषण, विदर्भाचे सुपुत्र, सुप्रसिद्ध सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनपर कीर्तन. सत्यपाल महाराज आपल्या रोखठोक, निर्भीड आणि अभ्यासपूर्ण वाणीने संत गाडगेबाबांच्या विचारांचा जागर करणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून सत्यपाल महाराज ऋणमोचन यात्रेत सहभागी होत असून, हजारो भाविक त्यांच्या कीर्तनाचा लाभ घेत आहेत. त्यांच्या सप्तखंजेरीतून Gadge बाबांच्या दशसूत्री विचारांचे चिंतन, समाजप्रबोधन आणि आत्मपरीक्षणाचा संदेश दिला जातो. यंदाही 18 जानेवारी रोजी हा कार्यक्रम पार पडणार असून, समाजातील सर्व घटकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विविध समाजांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग

या यात्रेत धोबी, वरठी, परीट, रजक समाजासह संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातील विविध समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. बहुभाषिक, विविध प्रांतांतील भाविक येथे एकत्र येऊन Gadge बाबांच्या विचारांना मानवंदना देतात. उत्तर तीरावरील महादेव मंदिर परिसरात समाजबांधव एकत्र येऊन दशसूत्रीचा जागर करतात. ही यात्रा सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरत आहे.

कार्यक्रमांचे स्वरूप

दि. 18 जानेवारी 2026 रोजी सकाळपासून पुढीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

  • सकाळी ध्वजारोहण व पूजन

  • संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस अभिवादन

  • सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांचे प्रबोधनपर कीर्तन

  • युवाप्रबोधनकार, भारूडकार कैलास खडसान यांचे विशेष सादरीकरण

  • त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन

महाप्रसादातून सर्व भाविकांना समानतेचा आणि सेवाभावाचा संदेश दिला जाणार आहे.

दशसूत्रीचा आशय आजही तितकाच महत्त्वाचा

संत Gadge बाबांचे विचार काळाच्या ओघातही आपली उपयुक्तता गमावलेली नाहीत, उलट आजच्या समाजासाठी ते अधिकच मार्गदर्शक ठरत आहेत. ग्रामगीतेतून त्यांनी गावकुसाच्या शिक्षणावर विशेष भर दिला, कारण शिक्षणाशिवाय समाजाची खरी उन्नती शक्य नाही, असा त्यांचा ठाम विश्वास होता. समाजात वाढत चाललेला व्यर्थ आणि दिखाऊ लग्नखर्च थांबवावा, विवाह हा सामाजिक बांधिलकीचा सोहळा असावा, आर्थिक ओझ्याचा नव्हे, हा संदेश त्यांनी सातत्याने दिला. गरीब, निराधार आणि वंचित घटकांना शिक्षणासाठी मदतीचा हात देणे हे त्यांनी समाजाचे कर्तव्य मानले.

त्याचप्रमाणे प्राणीमात्रावर दया दाखवणे, करुणा आणि मानवतेची भावना जोपासणे, हे त्यांच्या विचारांचे केंद्रबिंदू होते. समाजातील अंधश्रद्धा, रूढी आणि अवैज्ञानिक परंपरांवर त्यांनी निर्भीडपणे प्रहार केला. हातातील खराटा हा केवळ रस्ते किंवा परिसर स्वच्छ करण्याचे साधन नव्हते, तर तो माणसाच्या मनातील अज्ञान, भीती आणि अंधश्रद्धेची घाण दूर करणारे प्रतीक होता. त्यामुळे संत गाडगेबाबांचा खराटा हा मानसिक व सामाजिक स्वच्छतेचा प्रभावी संदेश देणारा ठरतो आणि आजही तो समाजाला आत्मपरीक्षणाची प्रेरणा देतो.

सर्व समाजबांधवांना आवाहन

श्री. संत Gadge बाबा कर्मभूमी स्मारक समिती, क्षेत्र ऋणमोचन, जिल्हा अमरावती यांच्या वतीने सर्व समाजबांधव, भाविक, युवक-युवती आणि नागरिकांना दि. 18 जानेवारी 2026 रोजी ऋणमोचन येथे उपस्थित राहून या कर्मभूमी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संत गाडगेबाबांच्या विचारांचा जागर करून समाजाला नवी दिशा देण्याचा हा महोत्सव सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

read also:https://ajinkyabharat.com/mumbai-marathon-2026-65-thousand-more-runners/

Related News