शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त; क्रीडा संकुल समितीकडे ताबा

शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त; क्रीडा संकुल समितीकडे ताबा

अकोल्याच्या हिंगणा म्हैसपूर येथील ४ हेक्टर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त; क्रीडा संकुल समितीकडे ताबा

अकोला : मौजे हिंगणा म्हैसपूर (ता. अकोट) येथील “इ” वर्ग शासकीय जमीन, सर्वे क्र. ३ मधील सुमारे ४ हेक्टर आर क्षेत्रावर जयराम गौरक्षण ट्रस्टने केलेले

अनधिकृत अतिक्रमण अखेर प्रशासनाने हटवले.

Related News

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात ही जागा अतिक्रमणमुक्त करून

जिल्हा क्रीडा संकुल समिती अकोला व क्रीडा प्रबोधिनी अकोला (महाराष्ट्र शासन) यांच्या अधिकृत ताब्यात देण्यात आली.

या कारवाईदरम्यान अतिक्रमणाच्या ठिकाणी सूचनाफलक लावण्यात आला असून, यापुढे अनधिकृत बांधकाम वा वापर

केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ट्रस्टच्या ताब्यातील जनावरांची व्यवस्था आदर्श गौरक्षण संस्था आणि डाबकी रोड गौरक्षण संस्थेत करण्यात आली आहे.

या प्रशासकीय कारवाईमुळे शासकीय मालमत्तेचे संरक्षण होऊन क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी मार्ग मोकळा झाला आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/mahanas-mahatvachis-kaghutam-dadar-kabhutarkhana-episode/

Related News