सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न व औषध प्रशासनाची तपासणी मोहीम सुरू

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न व औषध प्रशासनाची तपासणी मोहीम सुरू

अकोला, दि. 11 : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या संकल्पनेतून राज्यभर “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा” या मोहिमेला ११ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट दरम्यान सुरूवात झाली आहे.

अकोल्यात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ झाला.

सणासुदीच्या काळात तूप, तेल, मिठाया, खारे पदार्थ तसेच विविध अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

Related News

सहाय्यक आयुक्त (अन्न) दे. गो. वीर, अन्न व औषध प्रशासन अधिकारी र. व्दा. सोळंके आदी अधिकारी उपस्थित होते.

शुभारंभीच्या दिवशी एमआयडीसी परिसरातील मे. राठी पेढेवाला फुड्स प्रॉडक्ट प्रा. लि. या उत्पादन युनिटची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली.

अन्न सुरक्षा अधिकारी श्री. सोळंके यांनी पेढा, बेसन, शेंगदाणा तेल व सुपर पामोलिन तेल यांचे नमुने विश्लेषणासाठी घेतले तसेच अन्नसुरक्षेसंबंधी सूचना दिल्या.

या कालावधीत शहर व जिल्ह्यातील उपाहारगृहे, खाजगी अन्न उत्पादन उद्योग, मिठाई पेढ्या आदींची सखोल तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/swatantra-dinacha-main-government-ceremony-mumbai/

Related News