माफ कर मी तुला… बायकोची माफी, आशीर्वाद अन् ब्लास्ट! ‘धुरंधर 2’मधील खऱ्या चौधरी असलमचा थरारक शेवट उघड

चौधरी असलम

पाकिस्तानातील गँगवॉर आणि दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘धुरंधर 2’ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेता Sanjay Dutt याने साकारलेली एसपी चौधरी असलम यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली असली, तरी या व्यक्तिरेखेच्या वास्तव मांडणीवरून वाद निर्माण झाला आहे. कारण, खऱ्या आयुष्यातील चौधरी असलम यांच्या पत्नी नूरीन असलम यांनी सिनेमातील चित्रणावर नाराजी व्यक्त करत त्यांच्या आयुष्यातील आणि मृत्यूतील थरारक सत्य समोर आणले आहे.

चौधरी असलम हे पाकिस्तानातील अत्यंत धाडसी आणि निर्भीड पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी कराचीतील ल्यारी भागात गँगवॉरविरोधात मोठी मोहीम उघडली होती. या ऑपरेशनदरम्यान गोळीबार, रॉकेट हल्ले आणि प्रचंड हिंसाचाराचा सामना करत त्यांनी गुन्हेगारीविरोधात लढा दिला. नूरीन यांच्या मते, त्या काळात परिस्थिती इतकी भीषण होती की महिलांचा वापर ढाल म्हणून केला जात होता, कारण कायद्यामुळे त्यांच्यावर गोळीबार करणे शक्य नव्हते.

ल्यारी ऑपरेशनदरम्यान चौधरी असलम यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कारवाई केली. विशेष म्हणजे त्यांनी कधीही बुलेटप्रूफ जॅकेट घातले नाही. नूरीन यांनी अनेकदा त्यांना सुरक्षिततेसाठी जॅकेट वापरण्याचा आग्रह केला, पण त्यांनी तो नेहमीच नाकारला. “माझ्या नशिबात जे लिहिलं आहे, तेच होईल,” असं ते नेहमी म्हणायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली.

Related News

दरम्यान, 2011 साली त्यांच्या कुटुंबावर झालेला भयानक बॉम्बस्फोट हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात धक्कादायक प्रसंग होता. त्यांच्या घरावर 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या बॉम्बने हल्ला करण्यात आला. या भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला, तर घर उद्ध्वस्त झाले. सुदैवाने चौधरी आणि त्यांचे कुटुंब त्या हल्ल्यातून बचावले. या हल्ल्याची जबाबदारी Tehrik-i-Taliban Pakistan या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.

या घटनेनंतरही चौधरी असलम यांनी आपला लढा थांबवला नाही. उलट त्यांनी दहशतवाद्यांविरुद्ध अधिक आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या कारकिर्दीत एकूण 11 वेळा जीवघेणे हल्ले झाले होते. तरीही ते न डगमगता काम करत राहिले.मात्र, 2014 साली त्यांच्यावर झालेला आत्मघातकी हल्ला हा त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरला. त्या दिवशी घडलेली घटना अत्यंत भावनिक आणि धक्कादायक होती. नूरीन यांच्या मते, घरातून बाहेर पडण्यापूर्वी चौधरी असलम यांनी त्यांची माफी मागितली. “मी तुला कधीच वेळ देऊ शकलो नाही, मला माफ कर,” असे ते म्हणाले. त्यावर नूरीन यांनीही त्यांना आशीर्वाद दिला.

घरातून निघाल्यानंतर काही वेळातच चौधरी असलम यांनी नूरीन यांना फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी ती भेट पुढे ढकलली. त्यावेळी चौधरी असलम यांनी “खुश राहा… खुदा हाफिज” असे शेवटचे शब्द उच्चारले.

फक्त काही मिनिटांतच भीषण स्फोट झाला. 125 किलो स्फोटकांनी भरलेली कार त्यांच्या वाहनावर आदळली आणि आत्मघातकी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी पुन्हा एकदा Tehrik-i-Taliban Pakistan ने स्वीकारली.या घटनेनंतर पाकिस्तानातील अनेक मोठ्या नेत्यांनी शोक व्यक्त केला. त्यामध्ये Pervez Musharraf आणि Nawaz Sharif यांचाही समावेश होता.

नूरीन असलम यांच्या या खुलाशांमुळे ‘धुरंधर 2’मधील व्यक्तिरेखा आणि वास्तविकता यामधील फरक पुन्हा चर्चेत आला आहे. एका धाडसी अधिकाऱ्याचा शेवट किती वेदनादायक आणि नाट्यमय होता, याची ही कहाणी अंगावर काटा आणणारी आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/raja-shivaji-teaser-reaction-raja-shivaji-teaser-mixed-reaction-due-to-casting/

Related News