जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे आवाहन

जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे आवाहन

अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका, जिल्हा परिषद

आणि नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे,

असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर यांनी केले.

Related News

येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी (ता. ८) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता

जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर व जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न झाली.

यावेळी महानगरप्रमुख योगेश अग्रवाल, पश्चिम शहर प्रमुख रमेश गायकवाड,

पूर्व शहर प्रमुख अँड.पप्पू मोरवाल, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे, गोपाल म्हैसणे, निवासी उपजिल्हाप्रमुख संतोष अनासने,

तालुकाप्रमुख विजय वानखडे, प्रकाश गीते, अनंत बगाडे, मुर्तीजापुर तालुका प्रमुख दीपक दांदळे,

सचिन गालट, मंगेश म्हैसणे, जिल्हा समन्वयक गजानन पावसाळे, गणेश बोबडे, जिल्हा संघटक बादल सिंग ठाकूर,

तालुका संघटक रमेश थुकेकर, शहर संघटक सागर पूर्णेय, राहुल जाधव,महिला समन्वयक स्वानंदीताई पांडे,

महिला उपजिल्हाप्रमुख संगीताताई शुक्ला, महिला महानगरप्रमुख निशाताई ग्यारल, महिला शहर प्रमुख प्रीती मोहोळ,

जयश्री तोरडमल, प्रतिभा दांगटे, युवा सेना लोकसभा प्रमुख कुणाल पिंजरकर, उपशहर प्रमुख प्रदीप काशीद,

राजेश पिंजरकर, राजेश दांडेकर, प्रतीक मानेकर, नितीन बदरखे, भूषण इंदोरिया,स्वप्निल देशमुख, अश्विन लांडगे,

दीपक नावकार, शुभम वानखडे, राजेश कलाने, सतीश समुद्रे, जिल्हा सचिव सतीश गोपनारायण, संजय रोहनकर,

मधुकर सोनारगन ,चेतन जैन, समीर शहा, सुभाष भागवत, प्रवीण गावंडे, ऋषिकेश सोनारगन ,

राहुल सोनारगण उपस्थित होते. यावेळी शहर प्रमुख रमेश गायकवाड, पप्पू मोरवाल, अकोला तालुकाप्रमुख विजय वानखडे,

तालुकाप्रमुख सचिन गालट महिला जिल्हा समन्वयिका स्वानंदीताई पांडे,

जिल्हा समन्वयक गजानन पावसाळे यांनी आपले विचार प्रकट केले.

आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने संघटन बांधणी, संघटन रचना,

व निवडणुकीच्या तयारीबाबत मार्गदर्शन शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर व जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी केले.

यावेळी अकोला पश्चिम, अकोला पूर्व व पातुर विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला.

यावेळी पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या भारतीय नागरिकांचा मिशन

सिंदूर राबवत भारत सरकारने जे सडेतोड उत्तर दिले त्या प्रित्यर्थ पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या

भारतीय नागरिकांना मिशन सिंदूर हीच खरी श्रद्धांजली या भावनेने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार महानगर प्रमुख योगेश अग्रवाल यांनी केले,

अशी माहिती जिल्हा प्रसिद्ध प्रमुख शंकर जोगी यांनी दिले.

Read Also : https://ajinkyabharat.com/protection-minister-rajnath-singh-yanchi-tinhi-dalpramukhanskat-high-level-meeting/

Related News