विरोधक-सत्ताधाऱ्यांचे ‘महाभारत’
संसदेतून सेंगोल हटवा अशी लेखी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार
आर. के. चौधरी यांनी केली आहे.
Related News
त्यांनी या संदर्भात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे.
सेंगोल हटवून त्या ठिकाणी देशाचे संविधान ठेवा अशी मागणीही पा पत्रात करण्यात आली आहे.
त्यानंतर भाजपाच्या खासदारांनी टीकेचे बाण चालवले आहेत.
सेंगोल म्हणजे राजदंड, याचा अर्थ राजाच्या हाती असलेला दंड असाही होतो.
पण राजेशाही संपून देश स्वतंत्र झाला आहे.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे.
मग सत्ता राजदंडाप्रमाणे चालणार आहे की संविधानाप्रमाणे?
त्यामुळेच माझी मागणी आहे की संसदेतून सेंगोल हटवण्यात यावा
आणि त्या ठिकाणी संविधान ठेवण्यात यावे,
मागच्या वर्षी नव्या लोकसभेत सेंगोल ठेवण्यात आला आहे.
हा सेंगोल ब्रिटिशांनी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरुंच्या हाती सोपवला होता.
आम्ही आत्ता सत्ता सोडत आहोत तुम्ही ती स्वीकारा हा त्याचा प्रतीकात्मक अर्थ होता.
आता हाच सेंगोल हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीष अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सेंगोलच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्या खासदाराने ही मागणी केली, याचे कारण संसदेत पहिल्यांदा जेव्हा सेंगोल ठेवण्यात आला
तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला नमस्कार केला होता.
मात्र यावेळी खासदारकीची शपथ घेताना सेंगोलचा नरेंद्र मोदींना विसर पडला.
लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मौसा भारती यांनीही सेंगोल संसदेतून हटवण्याची मागणी केली.
भारत हा लोकशाही मानणारा देश आहे.
सेंगोल आता संग्रहालयात ठेवला पाहिजे म्हणजे तो संग्रहालयाला भेट देणाऱ्या
अभ्यासकांना, पर्यटकांना पाहता येईल.
खासदार मनोज झा म्हणाले की, सेंगोल संसदेतून हटवला पाहिजे.
राजांची प्रतीकं, मुद्रा कशाला संसदेत हवीत ?
त्यापेक्षा संविधानच त्या ठिकाणी ठेवलं गेलं पाहिजे.
काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी म्हणाल्या, भाजपाला कधीही दाक्षिणात्य संस्कृती समजणार नाही.
तामिळ संस्कृती म्हणजे फक्त सेंगोल नाही.
तर त्या संस्कृतीत सर्वाधिक बुद्धिमान लोक आहेत.
बिहारचे भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा
यांनी या प्रकरणी काँग्रेसवर टीका केली आहे.
काँग्रेस सत्तेत येण्यासाठी लोकांची दिशाभूल करत आहे असं त्यांनी म्हटलं आहे
तर योगी आदित्यनाथ यांनीही यावर टीका केली आहे.
समाजवादी पक्षाने ही मागणी करुन तामिळ संस्कृतीचा अपमान केला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ladki-bahisin-sobat-ladka-bhau-yojana-aana/