बाळापूर शहरातील ताप्र पोलीस स्टेशनलगत असलेल्या भिकुंड नदीपात्रात रविवारी सकाळी एक पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी ही घटना लक्षात येताच तात्काळ पोलिसांना कळविले.
घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. याप्रकरणी मर्ग क्रमांक 69/25 अंतर्गत कलम 194 बी.एन.एन.एस. अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोहवा गवळी मेजर (ब.नं. 394) यांच्याकडे आहे.
मृत व्यक्तीची ओळख मुशरिफ अहमद गुलाम अहमद (वय 39, रा. बडा मोमीनपुरा, बाळापूर, जि. अकोला) अशी झाली आहे. फिर्यादी अन्सारी अनिक अहमद रफी (वय 46, रा. बडा मोमीनपुरा, बाळापूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक हा त्यांचा चुलत भाऊ असून तो गेल्या 8 नोव्हेंबर रोजी घरातून काहीही न सांगता निघून गेला होता. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी शोध घेतला पण तो मिळून आला नव्हता. याबाबत पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद (क्रमांक 65/25) करण्यात आली होती.
Related News
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अळोशी आणि कळोशी गावांच्या शेतशिवारात वन्यजीव प्राणी रोही यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी...
Continue reading
https://youtu.be/haX187qwB48?si=xuY5eYJ3yVuG-6aeअकोला जिल्ह्यातील वाघा येथील काटेपूर्णा प्रकल्पात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन करण्यात आले. रा...
Continue reading
Akola Accident News : अकोल्यात भरधाव कारचा टायर फुटून 10 फूट खोल खड्ड्यात कार उलटली. या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू तर पाच जण गंभ...
Continue reading
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील सायत फाट्यावर बुधवारी रात्री भीषण रस्ते अपघाताची हृदयद्रावक घटना घडली. स्थानिक रहिवाशांच्या आण...
Continue reading
स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई : 6 लाख 69 हजार 202 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस स्टेशन खदान येथे दाखल गुन...
Continue reading
शेगाव प्रतिनिधी | दि. 28 जानेवारी 2026
शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ शिवारात असलेल्या नवनाथ महाराजांच्या मंदिरातील मूर्तींची अज्ञात व्यक्तींनी केलील्या तोडफोडीची घटना परिसरात
Continue reading
कुरणखेड – २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मोटर वाहन विभागाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अकोला येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात कुरणखेड येथील
Continue reading
पोपटखेड पथकाने धाडस, समर्पण आणि सेवाभाव दाखवत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात प्रेरणा दिली
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या पोपटखेड येथील वीर एकलव्य आपत्कालीन शोध व ब...
Continue reading
अकोला ते शिमला… आठ वर्षांनंतर बेपत्ता तरुणाचा चमत्कारिक शोध
गोशाळेत मजुरी करत जगत होता आयुष्य; ओळखपत्र तपासणीत उलगडली कहाणी, व्हिडिओ कॉलवर वडिलांच्या डोळ्यांत अश्रू
दरम्यान जयेश ...
Continue reading
वाडेगाव : भारत मुक्ती मोर्चा व बामसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय अधिवेशन ओडिशा राज्यातील कटक येथे दि....
Continue reading
मूर्तिजापूर आगारात शुक्रवार (ता. १६) रोजी इंधन बचत मासिक मोहिमेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मूर्तिजापूरचे निद...
Continue reading
आज (दि. 9 नोव्हेंबर) सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास चार्जर हॉटेलजवळील भिकुंड नदीपात्रात एक मृतदेह दिसून आला. फिर्यादींनी मृतदेहाची ओळख मुशरिफ अहमद अशी पटवून दिली. प्राथमिक तपासात तो पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे.
फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, मृतक डोक्याने अस्वस्थ होता व त्याने स्वतःहून पाण्यात उडी मारून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला असून, पुढील तपास सुरु आहे.
read also : https://ajinkyabharat.com/pollution-and-skin-problems-face-damage-and-easy-solutions-due-to-increasing-pollution/