मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय आणि सुरेल आवाजासाठी ओळखली जाणारी गायिका शुभांगी केदार हिने आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. शुभांगीने प्रनित वानवे यांच्यासोबत पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकत कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला. लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
![]()
या विवाहसोहळ्यात शुभांगीचा पारंपरिक लूक विशेष चर्चेत राहिला. मात्र सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते तिच्या युनिक मंगळसूत्राने. काळ्या मण्यांच्या पारंपरिक माळेला सोन्याच्या नाजूक आणि आधुनिक डिझाइनची जोड देण्यात आली होती. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दाखवणारे हे मंगळसूत्र नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले असून सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा रंगली आहे.
Related News
Viral Video: निखिल चव्हाणचा 1 भन्नाट उखाणा चर्चेत; ‘आमदार-खासदार फुटतायत…’ म्हणत अनुष्कासाठी व्यक्त केलं प्रेम
अनुष्का सरकटे–निखिल चव्हाण लग्न: 7 शानदार मेंदी फोटो व्हायरल! रोमँटिक सेलिब्रेशनने चाहत्यांना दिला आनंद
7 दमदार फोटोंमध्ये जान्हवी किल्लेकरचा लालभडक साडी लूक; खास मंगळसूत्राच्या डिझाईनने जिंकले चाहत्यांचे मन
ईशा डे–अभिषेक खणकर यांची फिल्मी लव्हस्टोरी: १५ वर्षांनी पुन्हा जुळले बंध, ‘नियती’ने घडवली खास गाठ
Soham Bandekar Wedding Photo Funny Story: 7 जबरदस्त गुपितं! ‘रोमॅन्टिक वाटणारा फोटो’ मागचा धक्कादायक किस्सा
![]()
लग्नसोहळा साधा पण देखणा ठेवत शुभांगी आणि प्रनित यांनी मराठमोळ्या रितीरिवाजांना प्राधान्य दिले. शुभांगीच्या चाहत्यांनी तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत “तुझा आवाज जसा गोड, तसंच आयुष्यही गोड जावो,” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
![]()
गायन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या शुभांगीच्या या नव्या प्रवासाकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/5-crore-karjat-adkalela-rajpal-yadav-charged-this-much-fee-for-a-film/
