मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ‘अॅडल्ट स्टार’चा वापर केला जात असल्याचा आरोप भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला होता. त्यानंतर संबंधित अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी चित्रा वाघ यांना इशारा दिला आहे. “चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन” असा इशाराच नयानी यांनी दिला आहे.
काय म्हणाले अभिनेते राज नयानी?
“मी एक चरित्र अभिनेता आहे आणि एका कलावंताचा अपमान केला म्हणून भाजपा नेता चित्रा वाघ यांनी शब्द मागे घ्यावेत, माझी माफी मागावी अन्यथा, इच्छा नसतानाही मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन ” अशी भूमिका अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी व्यक्त केली.
आज समाजमाध्यमा वर व्हिडीओद्वारे त्यांनी भूमिका मांडली. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या एक सुशिक्षित महिला आहेत. कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमांत किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्याला त्या भूमिकेची जशी मागणी असते त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो हे त्यांना माहीत असावे, अशी अपेक्षा नयानी यांनी व्यक्त केली.
Related News
जालना जिल्ह्यातील तालुक्यातील अनवा येथील एका व्यक्तीला चटके देऊन मानवी कौर्याचां आणखी एक
व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपूर्वी समोर आला. तप्त लोखंडी सळईने अंगावर चटके देऊन
अमानुष म...
Continue reading
Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता.
यातील आरोपी भाजपचा माजी नगरसेवक असून तो सध्या शिवसेना शिंदे गट...
Continue reading
तरुण-तरुणींना सरकारी कार्यालयं आणि खासगी कंपन्यांमधील
कामांचा अनुभव मिळावा आणि ते रोजगारक्षम व्हावेत यासाठी
एकनाथ शिंदे सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरु केली.
मुंबई...
Continue reading
Tiradi Agitation : स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणात नवनवीन खुलासे आणि दावे करण्यात येत
असताना संघटना सुद्धा आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी याप्रकरणात आंदोलन छेडले आहे.
गृहरा...
Continue reading
दोन दिवसीय ब्लॉकमध्ये ५९ लोकल आणि तीन मेल-एक्स्प्रेस रद्द राहणार
असून ४७ मेल-एक्स्प्रेसवर परिणाम होणार आहे.
काही मेल-एक्स्प्रेस दादर स्थानकात थांबवण्यात येणार
असून त्याच स्थानका...
Continue reading
गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे प्रमाण वाढले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची
धमकी देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता
मंत्रालयातील मुख्यम...
Continue reading
छत्रपती संभाजीनगरमध्येच ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार
सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी होऊन दहा दिवसही
लोटले नसताना, आता परदेशींनीही पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतल...
Continue reading
माजी आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात
शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार केला होता.
त्याप्रकरणी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याचे नाव चार्जशी...
Continue reading
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या
हत्या प्रकरणात कुटुंबियांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत.
आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे भाष्य केले ...
Continue reading
शिवसेनेच्या नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत
आणि उबाठा गटाने टीका केली. याचा समाचार घेताना
आता मंत्री संजय शिरसाट हे दिसले आहेत.
संजय शिरसाट यांनी उबाठा गटावर अनेक गंभीर आरोप केले....
Continue reading
Stock Market Nifty50 Down: फेब्रुवारीमध्येही देशांतर्गत शेअर
मार्केटमध्ये सलग पाचव्या महिन्यात घसरणीचा ट्रेंड सुरु राहिल्यास
निफ्टी50 गेल्या २८ वर्षांतील सर्वात मोठ्या पडझडीच्या ...
Continue reading
मुंबईत वाढत्या उष्णतेमुळे आणि कमी झालेल्या पाऊस पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठा अर्ध्यावर आला आहे.
मुंबई महापालिकेने पाणी जपण्याचे आवाहन केले आहे आणि पाणी कपात होण्याची शक्यता व...
Continue reading
“आज त्यांनी माझ्या एका वेबसिरीजच्या भूमेकेतील फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्याची मी निंदा करतो आणि माझ्या अभिनयाला पॉर्न स्टारची उपमा देऊन माझी अब्रू नुकसानी केल्याचा आक्षेप त्यांच्यावर घेतो. त्यांनी दोन दिवसात माझी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर मी अब्रूनुकसान केल्याचा दावा कोर्टात दाखल करेन.” असा इशाराच त्यांनी दिला आहे.
“शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जाहिरातीत मी काम केले आहे, त्यामुळे त्या जाहिराती करणारा कलावंत पॉर्न स्टार असल्याचा शोध त्यांनी लावला. जे फोटो त्यांनी प्रेस कॉन्फरेन्समध्ये दाखवले ते माझ्या एका वेब सिरीजमधले आहेत आणि ते त्या भूमिकेचा एक भाग होता, असं नयानी यांनी स्पष्ट केलं.
“चित्रा वाघ यांनी विनाकारण माझ्या प्रतिमेला मलीन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला मनस्ताप सहन करावा लागला आहे. केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी माझी प्रतिमा मलीन केली आहे” असेही ते म्हणाले.
मी माझ्या भावना लपवत हा व्हिडिओ शूट करतोय; पण चित्राताई, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी कुटुंब व्यथित झालं आहे. गेल्या आठ वर्षात मी माझ्या तीन कुटुंबीयांना गमावलंय, त्यापैकी दोघांना तर करोना काळात गमावलं आहे. आता आम्ही तिघंच आहोत. मी एक पिता असून माझ्या दोन लेकरांचं पालनपोषण करतोय. पण एक राजकीय नेता राजकीय इराद्याने माझ्यावर आरोप करणं धक्कादायक आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.