पालघर : पालघर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारले हा माझ्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आणि स्वतःसाठी दुःखद निर्णय आहे, अशा भावना पालघरचे विद्यमान खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील राजेंद्र गावित यांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करुन महायुतीच्या उमेदवाराला विजयी करणार, असा विश्वासही गावितांनी बोलून दाखवला. शिवसेनेकडे असलेला पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपने हिसकावून घेत हेमंत विष्णू सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
राजेंद्र गावित काय म्हणाले?
पालघर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारले हा माझ्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आणि स्वतःसाठी दुःखद निर्णय आहे. हे खरे असले तरी माझ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांचा मला फोन येत असून वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत.
माझे जरी तिकीट नाकारले गेले असले तरीसुद्धा महायुतीचे जे उमेदवार आहेत. त्या उमेदवाराबाबत कार्यकर्त्यांमध्ये असलेले नैराश्य आणि नाराजी दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपण प्रयत्न करूया असे आवाहन पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
Related News
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठीच भाजपचा डाव; पुण्याच्या घटनेवरून खासदार प्रणिती शिंदे यांचा घणाघात
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्या...
Continue reading
वारस हक्काने वडिलांची मालमत्ता मिळते, पक्ष मिळत नाही; रामदास कदम यांचा ठाकरेंना टोला
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कोणाचे,...
Continue reading
शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद? मोदींच्या मंत्रिमंडळात थेट एन्ट्रीची चर्चा; बंडू जाधवांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ!
Continue reading
राहुल गांधींच्या पुणे कार्यक्रमावर फडणवीसांचा खळबळजनक दावा; ‘पॉझिटिव्ह कंटेट टाका, तरच पैसे’
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी
Continue reading
मुंबईत मराठा-ओबीसी आमने-सामने येण्याची शक्यता; मनोज जरांगे पाटलांची समजूतदार भूमिका, 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम
Manoj Jarange Patil : मराठ...
Continue reading
अब्दुल सत्तार मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला; तासभर चर्चा, पण ‘वर्षा’वरील आंदोलनावर जरांगे ठाम
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापण्...
Continue reading
शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ पवार आक्रमक; राष्ट्रवादीत बैठकांचा धडाका, नेमकं काय शिजतंय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासू...
Continue reading
शिवसेना पक्षाचं चिन्ह अन् नाव कोणाचं? राहुल नार्वेकरांचा मोठा दावा; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या शिवसेना पक्षाचं...
Continue reading
महायुतीची मोठी खेळी; फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व आमदारांचे स्नेहभोजन
महाराष्ट्राच्या राजकारणातून महायुतीशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगाम...
Continue reading
संजय राऊत : राहुल गांधी या देशाचा नेता आहे, हे सांगणारा मी पहिला माणूस; ‘छात्रो की गुंज’आधी भाजपवर जोरदार निशाणा
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते
Continue reading
राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर भाजपचा गंभीर आरोप; ‘ही छात्र की गुंज नाही, पैशांची गुंज’
काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहु...
Continue reading
राम माधव ISIच्या निवृत्त अधिकाऱ्यांना भेटले? प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; चार मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रका...
Continue reading
माजी मंत्री विष्णू सावरा यांचे चिरंजीव हेमंत सावरा यांना पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देत असल्याचे भाजपने गुरुवारी रात्री जाहीर केले. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या एक दिवस, किंबहुना जेमतेम काही तास आधी भाजपने तिकीट जाहीर केले. त्यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना मोठा धक्का मानला जात आहे. गावितांना दुःख झाले असले, तरी कुठलाही निर्णय घेण्यासाठी पक्षाने त्यांच्याकडे अवधीच दिला नाही.
विशेष म्हणजे राजेंद्र गावित हे पूर्वी भाजपवासी होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीत लढले. मात्र पालघरची जागा शिवसेनेला सुटल्याने गावितांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणूक लढली, ते विजयीही झाले. राजकीय दृष्ट्या ही एक प्रकारची अॅडजस्टमेंट मानली जात होती.
यंदा हा मतदारसंघ परत मिळवण्यासाठी भाजप आग्रही होतं. परंतु गावितांना पुन्हा संधी मिळणं फिक्स मानलं जात असल्यामुळे त्यांची घरवापसी होऊन ते भाजपच्या तिकिटावर आता रिंगणात उतरतील, अशी अटकळ बांधली जात असतानाच महायुतीत भाकरी फिरवण्यात आली.