चान्नी पोलिसांचा गावठी दारू अड्ड्यावर मोठा छापा; ८८,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

गावठी

अकोला – पोलीस अधीक्षक यांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांणी पोलिसांनी ग्राम सस्ती व ग्राम नवेगाव परिसरात गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकला. ही कारवाई १० नोव्हेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार करण्यात आली.

छाप्यात पोलिसांना हातभट्टीचे साहित्य व गावठी दारू असा एकूण ८८,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. या कारवाईत पुढील आरोपींची नावे समोर आली:

Related News

  1. पवन शामराव सरकटे, वय २४ वर्ष, रा. नवेगाव

  2. अशोक महादेव ससाने, वय ३४ वर्ष, रा. नवेगाव

  3. जगदेव महादेव ससाने, वय ५२ वर्ष, रा. नवेगाव

  4. विजय महादेव पांडे, वय ३८ वर्ष, रा. नवेगाव

  5. धनराज सुखदेव अंभोरे, वय २८ वर्ष, रा. सस्ती

सदर आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

छापा कारवाई अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक जिल्हा अकोला, बी.चंद्रकांत रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक,  गजानन पडघन,  उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन चान्नी , रवींद्र लांडे, पोलीस उपनिरीक्षक विजय घुगे, सुधाकर करवते, ज्ञानेश्वर गीते, रुपेश मोरे, शिवानंद स्वामी, राजनंदिनी पुंडगे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

पोलीसांच्या माहितीनुसार, ही कारवाई गावठी दारू निर्मिती व विक्रीवर प्रभावी पाऊल असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियम व कायद्याची शिस्त पाळण्याचा प्रयत्न आहे.

read also : https://ajinkyabharat.com/under-operation-prahar-action-was-taken-against-illegal-liquor-vendors-in-dahihanda-hadditil/

Related News