अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अवैध गॅस रिफिलिंग करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून ३७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस स्टेशन अकोट फाइल हद्दीतील अकोट रोड, ग्रीन पार्कसमोर, लक्ष्मी कॉलनी परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरणे सुरू असल्याचे समोर आले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंचांसह धाड टाकली.
छाप्यात फारुख खान आयुब खान (५२) व सैयद फरहान सैयद वजीओदिन (१९), दोन्ही राहणार अकोला, यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी हे घरगुती सिलिंडरमधून इलेक्ट्रिक मोटर पंप, प्लास्टिक नळ्या व नॉझलच्या सहाय्याने ऑटो रिक्षामध्ये गॅस भरत असल्याचे आढळून आले. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून कोणत्याही क्षणी स्फोट होऊन मोठ्या दुर्घटनेची शक्यता असल्याने तत्काळ कारवाई करण्यात आली.
Related News
महाराष्ट्र पुन्हा हादरला! खासगी शाळेच्या बस चालकाकडून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
नवी मुंबईतील धक्कादायक घटना; आरोपी बस चालकाला अटक, शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
नवी मुंबई आणि पन...
Continue reading
अखेर त्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; अपघातानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक, चाळीसगावात घडलं काय?
चाळीसगाव : चाळीसगाव-मालेगाव रोडवरील बिलाखेड ...
Continue reading
मुलाला केबिनबाहेर हुसकावले; पण तो पुन्हा आत आला अन् डॉक्टरवर केला हल्ला, कल्याणमध्ये नेमकं घडलं काय?
Kalyan Crime News : कल्याण पूर्वेतील भानु ज्योत हॉ...
Continue reading
खवड्या डोंगर मृत्यूकांड : कुणालच्या कुटुंबातील वादाचा धक्कादायक ट्विस्ट? आईची व्हायरल विनवणी चर्चेत
खवड्या डोंगरावरील मृत्यूकांडाने संपूर्ण परि...
Continue reading
खवड्या डोंगरावर हात जोडून विनवणी, आग्रह अन्… चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचा नवा थरारक व्हिडिओ समोर!
Khavdya Dongar New Video : छत्रपती...
Continue reading
कल्याणमध्ये थरारक हत्याकांड! प्रियकराची निर्घृण हत्या, मृतदेह गोणीत भरून बाथरूममध्ये लपवला; आरोपी महिला फरार
ठाणे जिल्ह्यातील कल्याणच्या मलंग रोड परिसर...
Continue reading
‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतन अग्रवालच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप; चौकशीची मागणी
पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्र...
Continue reading
स्नॅपचॅटवर जुळलेल्या प्रेमासाठी ओडिशातील १८ वर्षीय तरुणी प्रियकरासोबत महाराष्ट्रात आली. नातेवाईक आणि पोलिस तिच्या शोधात पोहोचले, मात्र १०० रुपयांच्या ...
Continue reading
विनायक राऊतांच्या अडचणीत वाढ! गिरिजा राऊत प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्...
Continue reading
विनायक राऊत यांच्या कुटुंबाविरोधातील तक्रारीनंतर नवा वाद; सुनेवर 13 बॅगा, सोनं-चांदी आणि पैशांच्या मागणीचे आरोप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाक...
Continue reading
बीड Crime News : आचारी म्हणून काम करून घरी परतणाऱ्या 21 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; क्षुल्लक वादातून चाकूहल्ला, मित्र गंभीर जखमी
बीड : महाराष्...
Continue reading
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर राऊत यांनी पहिल्यांदाच भूमिक...
Continue reading
जप्त मुद्देमाल –
या प्रकरणी आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.अकोला पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर आणि धोकादायक गॅस रिफिलिंग व्यवसायावर मोठा दणका बसला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/gold-silver-price-explosion-2025-7-big-shocking-changes/