चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरीत्या पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. १९ जानेवारी रोजी उमरा परिसरात ऑपरेशन प्रहार अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. ठाणेदार रवींद्र लांडे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, खामगाव तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथून उमरा गावाकडे दोन इसम दुचाकीवर अवैध पेट्रोल वाहतूक करत आहेत.
पोलिसांनी त्वरित सापळा रचून दुचाकी अडवली. तपासात सावरगाव येथील कविश्वर जगराम आडे आणि नितेश वामन आडे यांच्याकडून प्लास्टिक कॅनमध्ये एकूण ३५ लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले. याशिवाय दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईत जप्त केलेल्या पेट्रोल व दुचाकीचा एकूण मूल्य ४३,८५० रुपये इतका आहे.
या प्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व भारतीय दंडसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत बी. रेड्डी व बाळापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या देखरेखीखाली ठाणेदार रवींद्र लांडे, सुदर्शन चौरे आणि शिवनंद स्वामी यांनी केली.
Related News
अकोला महानगरपालिकेत सत्तास्थापनेचा तिढा; काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांची भूमिका ठरवणार राजकारणाचे गणित
अकोला महानगरपालिकेत सत्...
Continue reading
Akola Municipal Election 2026 मध्ये अकोला महानगरपालिकेतील महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपची कोंडी, ‘नॉट रिचेबल’ नगरस...
Continue reading
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सावत्र वडिलांवर अश्लील व्हिडिओंचा आरोप, वरिष्ठ IPS अधिकारी निलंबित
लेक रान्या राव आधीच सोन्या तस्करी प्रकरणात तुरुंगात; कर्नाटकात खळबळ
वरिष्ठ
Continue reading
माना (ता. मुर्तिजापूर)
अवैध कत्तल आणि गोवंशीय प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत माना पोलिसांनी महत्त्वाची...
Continue reading
अकोट: विदर्भातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी वन्यप्राण्यांमुळे शेतकरी व नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेवर होत असलेले धोके...
Continue reading
घरात CCTV कॅमेरा बसवताना या 5 चुका टाळा. रिमोट व्ह्यू, प्रायव्हसी झोन, डेटा स्टोरेज, पासवर्ड सुरक्षा – सर्व काही जाणून घ्या. तुमच्या घराची सुरक्षा आणि गोप...
Continue reading
निंबा अंदुरा सर्कलमधील नया अंदुरा येथे स्थापन करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान बहुउद्देशीय...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक, संतापजनक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे खंबीर नेतृत्व, प्रदेश उपाध्यक्ष आणि अकोला जिल्ह्यात प्रभावशाली नेते...
Continue reading
स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की, अवैधरित्या पेट्रोल विक्री करण्यासाठी ही वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई केली गेली. या कारवाईमुळे परिसरात अवैध पेट्रोल पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/akot-school-annual-love-conference-2026-colorful-program-of-gurumauli-sane-guruji-and-meenakshi-vidyalaya/