उद्योगपती डॉ. शमशीर वायलील यांचा 6 भारतीय कुटुंबांना मोठा आधार ; 2.6 कोटींची दिलासादायक मदत!

डॉ. शमशीर वायलील

डॉ. शमशीर वायलील; 2.6 कोटींच्या मदतीने कुटुंबांना दिला दिलासा

दुबईच्या एमिरेट्स रोडवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय कामगारांच्या कुटुंबांसाठी यूएईतील भारतीय उद्योगपती डॉ. शमशीर वायलील यांनी पुढाकार घेत तब्बल 2.6 कोटी रुपयांची मानवतावादी मदत जाहीर केली आहे. या मदतीमुळे तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील सहा भारतीय कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे दुःखाच्या छायेत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दुबईच्या एमिरेट्स रोडवर काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात सात कामगारांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेने भारतासह श्रीलंकेतील अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने अनेक घरांचे आर्थिक गणितच विस्कळीत झाले. अशा कठीण काळात व्हीपीएस हेल्थचे संस्थापक आणि चेअरमन डॉ. शमशीर वायलील यांनी मदतीचा हात पुढे करत मानवतेचा आदर्श निर्माण केला.

डॉ. शमशीर वायलील यांच्या कार्यालयातील प्रतिनिधींनी तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील मृत भारतीय कामगारांच्या कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी प्रत्येक कुटुंबाचे सांत्वन करत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द केले. याशिवाय श्रीलंकेतील मृत कामगाराच्या कुटुंबालाही प्रतिनिधीमार्फत मदत पोहोचवण्यात आली.

Related News

मानवतावादी पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत मृत झालेल्या प्रत्येक भारतीय कामगाराच्या कुटुंबाला 26 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. केवळ आर्थिक सहाय्यच नव्हे, तर संबंधित कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती मदतही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक कुटुंबाशी थेट संपर्क साधून त्यांच्या गरजांचे मूल्यमापन केले जात आहे.

तेलंगणातील कुटुंबांना मोठा आधार

या अपघातात तेलंगणातील तीन कामगारांचा मृत्यू झाला. त्यामध्ये जगित्याल जिल्ह्यातील नमिलिकोंडा येथील 51 वर्षीय सलीम सय्यद हुसेन, निर्मल जिल्ह्यातील कड्डम येथील 37 वर्षीय अब्दुल रफीक अब्दुल रहीम आणि जगित्याल जिल्ह्यातील ठक्कल्लापल्ले येथील 23 वर्षीय तिरुपती गोल्लापल्ली चंद्रैया यांचा समावेश होता.

सलीम सय्यद हुसेन यांचे कुटुंब सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पत्नी आणि तीन मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. चांगले घर बांधण्याचे आणि मुलांना उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी यूएईला गेले होते. मात्र नियतीने त्यांची स्वप्ने अधुरी ठेवली. त्यांच्या एका मुलाला आरोग्यविषयक समस्या असून मोठ्या मुलीच्या लग्नाची तयारीही सुरू होती.

23 वर्षीय तिरुपती गोल्लापल्ली चंद्रैया हे प्रथमच परदेशात रोजगारासाठी गेले होते. कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी सात महिन्यांपूर्वी यूएई गाठले होते. ते नियमितपणे घरी फोन करून कामाची माहिती देत असत. मात्र अचानक झालेल्या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

अब्दुल रफीक यांच्या मागे पत्नी रझिया बेगम आणि लहान मुलगी रिदा फातिमा आहे. त्यांच्या वडिलांनी सांगितले की 2015 मध्ये रस्ता अपघातात त्यांच्या इतर दोन मुलांचाही मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा मुलाला गमावल्याने संपूर्ण कुटुंब दुःखाच्या गर्तेत गेले आहे.

उत्तर प्रदेशातील कुटुंबांनाही आर्थिक दिलासा

उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील कोपागंज येथील अब्दुल रशीद जाकिर हुसेन, खुरहट येथील मार्कंडेय चौहान आणि बिजनौर जिल्ह्यातील सहसपुर येथील मोहम्मद साकिब लियाकत अली यांच्या कुटुंबांनाही प्रतिनिधींनी भेट देऊन मदत सुपूर्द केली.

मार्कंडेय चौहान यांच्या पश्चात पत्नी सरस्वती देवी आणि तीन मुले आहेत. त्यांची मुलगी अंकिता चौहान नुकतीच बारावी उत्तीर्ण झाली असून तिला बीएससी नर्सिंगचे शिक्षण घ्यायचे आहे. प्रतिनिधींच्या भेटीदरम्यान डॉ. शमशीर वायलील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अंकिताशी संवाद साधला. डॉ. शमशीर वायलील यांनी तिच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन देत मन लावून शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. तसेच, अभ्यास पूर्ण झाल्यानंतर यूएईमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठीही डॉ. शमशीर वायलील यांनी आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

अब्दुल रशीद जाकिर हुसेन हे रोजगाराच्या शोधात केवळ दोन महिन्यांपूर्वी यूएईला गेले होते. पत्नी फरीदा खातून आणि तीन लहान मुलींच्या भविष्यासाठी ते मेहनत घेत होते. परदेशातील हा शेवटचा प्रवास असेल आणि त्यानंतर कायमस्वरूपी भारतात राहणार असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र त्यांचे स्वप्न अपघातामुळे अधुरेच राहिले.

मोहम्मद साकिब लियाकत अली हे आठ महिन्यांपूर्वी प्रथमच दुबईला गेले होते. यापूर्वी ते ॲल्युमिनियम फॅब्रिकेटर म्हणून काम करत होते. आई आणि बहिणींना आर्थिक आधार देण्यासाठी त्यांनी परदेश गाठला होता. कठीण परिस्थितीतही कुटुंबाच्या भविष्यासाठी ते संघर्ष करत राहिले, पण नियतीने त्यांना साथ दिली नाही.

श्रीलंकेतील कुटुंबालाही मदतीचा हात

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या श्रीलंकेतील 34 वर्षीय सामुवेल रेंगासामी यांच्या कुटुंबालाही मदत पोहोचवण्यात आली. डॉ. शमशीर वायलील यांच्या कार्यालयाचा प्रतिनिधी कोलंबोहून मुल्लैतिवु जिल्ह्यात पोहोचून त्यांच्या पत्नी आणि लहान मुलीची भेट घेतली. सामुवेल हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते.

read also : https://ajinkyabharat.com/shweta-tripathis-navy-look-fans-are-shocked-41-year-old-mirzapurs-golu-gupta-looks-20/

Related News