पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ब्रह्मोस अभियंत्याला मुंबई उच्च न्यायालयाने तीन वर्षे कारावासाची शिक्षा

ब्रह्मोस

पाकिस्तानशी संपर्क साधणाऱ्या अभियंत्याला न्यायालयाने सुनावली शिक्षा

नागपूर: पाकिस्तानसाठी हेरगिरी करून भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात टाकणाऱ्या ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीतील अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवाल (२८) याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी तीन वर्षे कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर आणि प्रवीण पाटील यांनी हा निर्णय दिला.

निशांत अग्रवाल नेहरूनगर, रुडकी (उत्तराखंड) येथील मुळ रहिवासी असून भारत-रशिया संयुक्त उपक्रम असलेल्या ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीच्या नागपूर प्रकल्पात सिस्टिम इंजिनियर पदावर कार्यरत होता. तो उज्ज्वलनगर येथील भाड्याच्या घरात राहत होता.

सत्र न्यायालयाने त्याला ३ जून २०२४ रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-एफ अंतर्गत जन्मठेप, शासकीय गुपिते कायद्याच्या कलम ३(१)(सी) अंतर्गत १४ वर्षे, तर कलम ५(१)(ए)(बी)(सी)(डी) आणि ५(३) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर अग्रवालाने या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केली होती.

Related News

तपासानुसार, अग्रवाल पाकिस्तानमधून नेहा शर्मा आणि पूजा रंजन या नावाने फेसबुक तसेच सेजल कपूर नावाने लिंक्ड-इन अकाऊंट चालवत होता. लखनौ एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार, अग्रवाल भारताच्या सुरक्षा विभागातील काही कर्मचार्‍यांशी संपर्क साधत होता. त्यानुसार त्याला ८ ऑक्टोबर २०१८ रोजी अटक करण्यात आली होती.

सदर प्रकरणातून भारताच्या संरक्षणात्मक यंत्रणेला गंभीर हानी पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/new-vice-chancellor-of-agricultural-school-dr-vilas-kharche/

Related News