अकोटच्या दोन महिलांनी राष्ट्रीय स्तरावर जिंकला नॅशनल लेव्हल कॅम्पियनचा मान

अकोट

अकोट: अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील बचत गटामधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत निवड झालेल्या दोन महिलांनी राष्ट्रीय स्तरावर आपली झेप सिद्ध केली आहे.

अकोला जिल्ह्यातून निवड झालेल्या दहीहंडा येथील पूजा जाणवाडे (बचत गट सदस्य) आणि आंबोडा येथील पल्लवी रंदे (बचत गट सदस्य) यांनी सखी फायनल फॉन्टियर कॉन्टेस्ट मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत नॅशनल लेव्हल कॅम्पियन हा मान मिळवला.

त्यांच्या या यशाबद्दल इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे रीजनल हेड गणेश कुलकर्णी यांच्या हस्ते नागपूर येथील जीपीओ कार्यालयात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन विश्वजीत तोंडे व सुदेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली केले गेले.

Related News

ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या उमेद अभियानातून उभ्या राहिलेल्या या दोन्ही सखींच्या यशामुळे अकोट तालुक्याचा मान उंचावला असून इतर बचत गटांसाठीही त्यांनी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/village-panchayat-officer-non-cooperation-movement-in-murtijapur/

Related News