नियमित योगासनामुळे रक्तदाब व तणावही होतो कमी!

तणाव

तणाव हा जीवनाचा एक भागच आहे.

चांगल्या कामगिरीसाठी थोडासा ताण चांगला आहे;

परंतु सततचा ताण आरोग्यासाठी हानिकारक असतो.

Related News

कारण त्याचा रोगप्रतिकार शक्तीवरही परिणाम होतो.

तणाव हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू असून,

त्यामुळे जगभरातील लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे.

ताणतणावामुळे इतर अनेक आजारांचा धोका वाढत असल्यामुळे

तणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे.

योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी योगाचे महत्त्व

सांगताना एक उदाहरण सांगितले आहे.

एक महिला योगा शिकण्यासाठी जेव्हा त्यांच्याकडे आली तेव्हा ती प्रचंड तणावात होती.

काम, मुलांची काळजी आणि कर्जाच्या परतफेडीच्या दबावामुळे

तिची झोप, भूक आणि एकूण आरोग्यावर परिणाम झाला होता.

तिला वारंवार डोकेदुखी, नैराश्य, निद्रानाश आणि बीपीसाठी औषधे दिली जात होती.

मात्र, एक महिन्याच्या योगाभ्यासानंतर ती तिचे बीपी नियंत्रित करू शकली.

दोन महिन्यांत तिची ऊर्जा पातळी सुधारली

आणि तिची दृष्टी समस्या पूर्णपणे नाहीशी झाली.

सहा महिन्यांत नैराश्य आणि झोपेची औषधेही बंद झाली.

तणाव हे तिच्या सर्व समस्यांचे मूळ असल्याचे दिसून आले.

संशोधनाने असे सिद्ध केले आहे की, योगामुळे तणाव कमी होतो,

मज्जासंस्थेचे संतुलन सुधारते आणि चांगले संप्रेरक तयार होतात,

झोपेची पद्धत सुधारते आणि तुम्हाला ऊर्जा मिळते.

उच्ब रक्तदाबाशी लढा देण्याकरता असाच एक नैसर्गिक उपाय म्हणजे योग होय.

योग केवळ तांत्रिकांना शांतच करत नाही तर तणाव दूर करून

वाढलेल्या रक्तदाबाला नियंत्रितदेखील करतो.

याच योगाभ्यासासंदर्भात योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी या संदर्भात

सविस्तर माहिती दिली आहे.

योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी तणावमुक्त होण्यासाठी काही आसन सांगितले आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/spains-final-euro-cup-final-after-12-years/

Related News