अकोला शहरात वसलेले एक अनोखे आणि पवित्र स्थळ – अंजनी माता आणि हनुमान यांचे
एकत्रित स्वयंभू मंदिर. देशात इतरत्र कुठेही न आढळणारे हे मंदिर,
अकोल्यातील मोहता मिल परिसरात स्थित असून “तपे हनुमान” या नावाने प्रसिद्ध आहे.
Related News
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
खदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे साडेचारशे ते पाचशे वर्षांची प्राचीनता. प्रत्येक वर्षी येथे ह
नुमान जन्मोत्सव, रामनवमी, तसेच इतर अनेक धार्मिक सण मोठ्या श्रद्धेने
आणि उत्साहात साजरे केले जातात. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक मंदिरात गर्दी करतात.
“हे मंदिर खूपच पवित्र आहे. संकटात असताना आम्ही येथे येतो आणि प्रार्थना करतो.
अंजनी मातेची आणि हनुमानाची कृपा नक्कीच मिळते.”
अंजनी माता, हनुमानाची माता, ही शक्तीचे प्रतीक मानली जाते. तिची पूजा केल्याने भक्तांना धैर्य,
आत्मविश्वास आणि संकटातून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरात स्तोत्र,
मंत्र पठण, पूजा-अर्चा या माध्यमातून भक्त आपली भावना व्यक्त करतात.
या मंदिराचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिलांनाही खुला प्रवेश आहे.
म्हणूनच देशभरातून येथे भक्तगण दर्शनासाठी येतात. हे मंदिर आज अकोल्यातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र
म्हणून ओळखले जात असून सरकारदरबारी याला अधिकृत तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
“हे मंदिर फक्त श्रद्धेचे नाही, तर सामर्थ्य आणि भक्तीचे प्रतीक आहे. याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यास अधिक भाविकांना सुविधा मिळतील.”
तपे हनुमान मंदिर, केवळ अकोल्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आध्यात्मिक वैभव असून,
येथील भक्तीमय वातावरण श्रद्धाळूंना मन:शांती आणि आंतरिक बल देणारे ठरते.